बहुतांश घरांमध्ये नियमितपणे वरण किंवा आमटी हमखास केली जातेच. ज्या घरांमध्ये वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलं असतात त्यांना पोळी किंवा भाकरी कुस्करून खाण्याची सवय असते. अशावेळी आमटी खूप सोयीची पडते. कधी कधी टोमॅटो, चिंच किंवा अमसूल घालून आंबट आमटी केली जाते तर कधी लसूण, कांदा घालून खमंग आमटी होते.. काही घरांमध्ये आमटीमध्येच मेथी, काशीफळ, भोपळा अशा भाज्याही आमटीमध्ये घातल्या जातात. एकंदरीतच काय तर आमटी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाच्या आवडीनुसार केली असली तरी ती चवदार होणं जास्त गरजेचं असतं. पण कधी कधी आमटी खूप पांचट होते आणि जेवणाची सगळी मजाच जाते (how to make amti, varan or dal more delicious?). त्यामुळेच ही एक ट्रिक पाहून घ्या. यामुळे तुम्ही केलेली कोणतीही आमटी नक्कीच अधिक चवदार होईल..(simple tips and tricks to enhance the taste of amti, varan or dal)
आमटी किंवा वरण अधिक चवदार होण्यासाठी टिप्स..
आमटी किंवा वरण अधिक चवदार होण्यासाठी काय करावं, याविषयीची माहिती सांगणारा व्हीडिओ vijeta.corner या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
९ महिने अंतराळात राहून सुनीता विल्यम्स यांनी काय केलं- कसा घालवला वेळ? बघा रंजक माहिती
यामध्ये असं सांगितलं आहे की आपण जी आमटी करतो ती तेव्हाच चवदार होते जेव्हा डाळीमधला किंवा आमटीमध्ये घातलेल्या सगळ्या मसाल्यांचा अर्क पाण्यामध्ये उतरतो. यासाठी आमटी चांगल्याप्रकारे उकळून घेणं गरजेचं असतं. पण नेमकं तिथेच आपण चुकतो.
बऱ्याच घरांमध्ये जेव्हा आमटीसाठी केलेली फोडणी तडतडली की तिच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते. पण असं न करता आधी फोडणीमध्ये पाणी घाला. त्यात तुम्ही टोमॅटो, चिंच, अमसूल, कांदा, लसूण असं जे काय घालणार आहात ते सगळं घाला आणि पाण्याला खळखळून उकळी येऊ द्या.
डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितली शिकंजी करण्याची सोपी रेसिपी, फक्त ५ मिनिटांत गारेगार शिकंजी तयार..
त्यानंतर मग त्यामध्ये शिजवलेली डाळ घाला आणि पुन्हा काही वेळ मंद गॅसवर आमटी उकळू द्या. यापद्धतीने केलेली आमटी किंवा वरण अधिक चवदार होईल असं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.