Lokmat Sakhi >Food > कपभर आवळ्याचे करा घरगुती आवळा सीरप, इन्स्टंट आवळा सरबताची साधीसोपी रेसिपी...

कपभर आवळ्याचे करा घरगुती आवळा सीरप, इन्स्टंट आवळा सरबताची साधीसोपी रेसिपी...

How to make Amla Juice at Home : How to preserve amla juice at home : Amla Sharbat Premix Recipe : How to Make & Preserve Amla Juice : आवळ्याचे सीरप एकदाच तयार करुन मग कधीही प्या आवडीने थंडगार अस्सल चवीचे आवळा सरबत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 21:29 IST2024-12-15T21:27:33+5:302024-12-15T21:29:08+5:30

How to make Amla Juice at Home : How to preserve amla juice at home : Amla Sharbat Premix Recipe : How to Make & Preserve Amla Juice : आवळ्याचे सीरप एकदाच तयार करुन मग कधीही प्या आवडीने थंडगार अस्सल चवीचे आवळा सरबत...

How to make Amla Juice at Home How to preserve amla juice at home Amla Sharbat Premix Recipe How to Make & Preserve Amla Juice | कपभर आवळ्याचे करा घरगुती आवळा सीरप, इन्स्टंट आवळा सरबताची साधीसोपी रेसिपी...

कपभर आवळ्याचे करा घरगुती आवळा सीरप, इन्स्टंट आवळा सरबताची साधीसोपी रेसिपी...

थंडीच्या दिवसांत बाजारांत वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाज्या, पालेभाज्या अगदी फ्रेश आणि ताज्या विकायला असतात. हिवाळा ऋतू म्हटलं की बाजारांत सगळीकडे गोड - आंबट, तुरट चवीचे आवळे (How to make Amla Juice at Home) पहायला मिळतात. या दिवसांत बाजारांत फार मोठ्या प्रमाणावर आवळे विकायला ठेवलेले असतात. असे गोल गरगरीत, ताजे फ्रेश आवळे मिळाले तर त्यापासून नक्की कोणते (How to Make & Preserve Amla Juice) आणि किती पदार्थ करावेत हे समजत नाही. हिवाळ्यात मिळणाऱ्या या आवळ्याचे लोणचं, मुरंबा, चटणी, मोरावळा, आवळा कँडी, आवळा सुपारी असे असंख्य पदार्थ प्रत्येक घरोघरी केले जातात(Amla Sharbat Premix Recipe.)

आवळ्याच्या या सगळ्या पदार्थांपैकी आंबट - गोड चवीचे आवळा सरबत तर सगळ्यात उत्तम आणि आवळ्याचा खास पदार्थ. शकयतो आपण बाजारांतून वेगवेगळ्या प्रकारच्या सरबतांची तयार सीरप घेऊन येतो.  कधी चहा - कॉफीचा कंटाळा आला किंवा पाहुणे आले असतील तर त्यांना देण्यासाठी म्हणून आपण वर्षभर पुरेल इतके इन्स्टंट आवळा सरबताचे सीरप विकत आणून ठेवतो. परंतु या तयार आवळा सरबतात ते टिकून राहण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह, भरपूर साखर आणि आर्टिफिशीयल रंग मिक्स केलेलं असतात. या सगळ्याच गोष्टी आपल्या आरोग्याला हानिकारक असतात. यासाठीच्या यंदाच्या आवळा सिझनमध्ये बाजारांत विकत मिळणाऱ्या ताज्या, फ्रेश आवळ्याचे आवळा सीरप तयार करून ठेवू शकतो. हेच आवळा सीरप वापरून आपण झटपट इन्स्टंट आवळा सरबत तयार करु शकतो. घरच्याघरीच सहा महिने टिकणारे आवळा सरबताचे इन्स्टंट सीरप कसे तयार करायचे त्याची रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. पाणी - १ कप 
२. साखर - ५ कप 
३. आवळ्याचा रस - १ कप  
४. लिंबाचा रस - १ कप 
५. आल्याचा रस - २ टेबलस्पून 
६. मीठ - १ टेबलस्पून 

‘नो ब्रेड मटार टोस्ट सँडविच‘- हिवाळ्यात नाश्त्याला करा मटारचा हा पदार्थ, मुलं म्हणतील रोज कर...

जान्हवी कपूर हिवाळ्यात आवडीने खाते रताळ्याचा ' हा ' खास पदार्थ, वजन होते कमी - पचनही सुधारते...

कृती :- 

१. सगळ्यात आधी आवळा स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करुन आवळा मिक्सरच्या भांड्यात फिरवून त्याचा रस काढून घ्यावा.
२. एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित मंद आचेवर ठेवून उकळवून घ्यावे. 
३. पाणी हलकेच उकळल्यानंतर त्यात साखर घालावी. 
४. पाण्यांत साखर घातल्यानंतर मंद आचेवर सतत चमच्याने हे मिश्रण हलवत राहून पाण्यांत साखर संपूर्णपणे विरघळवून घ्यावी. जोपर्यंत पाण्यांत साखर संपूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत चमच्याने हे साखरेचे सिरप सतत ढवळत राहावे. 
५. आता साखर पाण्यांत संपूर्णपणे विरघळल्यानंतर हे साखरेचे तयार सिरप थोडे थंड होण्यासाठी ठेवावे. साखरेचे सिरप पूर्णपणे थंड होऊ द्यावे. 
६. साखरेचे सिरप थंड झाल्यावर त्यात आवळ्याचा तयार रस आणि लिंबाचा रस घालावा. त्यानंतर यात आल्याचा रस व चवीनुसार मीठ घालावे.
७. तयार झालेले आवळ्याचे सरबत एका काचेच्या बाटलीत भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावे. 

किमान सहा महिने टिकणारे आवळ्याच्या सरबताचे सीरप तयार आहे. या सिरपचा वापर करुन आपण इन्स्टंट आवळा सरबत अगदी झटपट तयार करु शकतो. या सिरपचा वापर करुन आवळा सरबत तयार करताना एका ग्लासात पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून हे आवळा सरबताचे इन्स्टंट सीरप घालून चमच्याने हलवून घ्यावे. आवळा सरबत पिण्यासाठी झटपट तयार आहे.

Web Title: How to make Amla Juice at Home How to preserve amla juice at home Amla Sharbat Premix Recipe How to Make & Preserve Amla Juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.