lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > थंडीच्या दिवसांत प्या बदामाचं गरमागरम दूध, बघा ही कुणाल कपूर स्पेशल रेसिपी, मुलांनाही आवडेल

थंडीच्या दिवसांत प्या बदामाचं गरमागरम दूध, बघा ही कुणाल कपूर स्पेशल रेसिपी, मुलांनाही आवडेल

Kunal Kapoor Special Almond Milk Recipe: थंडीच्या दिवसांत कुणाल कपूर सांगतात तसं हे बदामाचं दूध एकदा तरी पिऊन बघायलाच पाहिजे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 05:12 PM2024-01-25T17:12:00+5:302024-01-25T17:20:05+5:30

Kunal Kapoor Special Almond Milk Recipe: थंडीच्या दिवसांत कुणाल कपूर सांगतात तसं हे बदामाचं दूध एकदा तरी पिऊन बघायलाच पाहिजे....

How to make almond milk for winter, Badam dudh recipe, Kunal Kapoor special Almond milk recipe, vegan recipe of almond milk | थंडीच्या दिवसांत प्या बदामाचं गरमागरम दूध, बघा ही कुणाल कपूर स्पेशल रेसिपी, मुलांनाही आवडेल

थंडीच्या दिवसांत प्या बदामाचं गरमागरम दूध, बघा ही कुणाल कपूर स्पेशल रेसिपी, मुलांनाही आवडेल

Highlightsवेगन डाएट फॉलो करणारे अनेक सेलिब्रिटी असंच अलमंड मिल्क पितात.

सध्या थंडीचे दिवस आहेत. काही ठिकाणी बोचरी थंडी आहे तर काही ठिकाणी कडाक्याच गारठा आहे. म्हणूनच या थंड थंड वातावरणात बदामाचं गरमागरम दूध पिऊन बघाच, असं सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगत आहेत (Badam dudh recipe). बदाम तसे उष्ण असतात. त्यामुळे हिवाळ्यात ते खायलाच पाहिजेत. कारण बदामातून शरीराला अनेक पौष्टिक घटक तर मिळतातच, पण भरपूर उर्जाही मिळते. वेगन डाएट फॉलो करणारे अनेक सेलिब्रिटी असंच अलमंड मिल्क पितात (vegan recipe of almond milk). हे दूध कसं तयार करायचं ते पाहा (How to make almond milk for winter) आणि तुम्हीही करून बघा. तुमच्यासकट घरातल्या लहान- मोठ्या सगळ्याच मंडळींना ते नक्की आवडेल. (Kunal Kapoor special Almond milk recipe)

बदाम मिल्क रेसिपी

 

साहित्य

१ कप बदाम

३ कप पाणी

दुपट्टा कमाल का!! तिरंगा ओढणी घ्या एकदम स्वस्तात, खरेदी करा नव्या स्टाइलच्या सुंदर ओढण्या

२ टेबलस्पून साखर

चिमूटभर हळद

चिमूटभर जायफळ

 

२ टेबलस्पून केशराचं पाणी

अर्धा टीस्पून वेलची पावडर

लाल मिरचीचं अस्सल बनारसी झणझणीत लोणचं, जेवणात येईल मस्त चव- बघा चटकदार रेसिपी

अर्धा टेबलस्पून गुलाबपाणी

१ टेबलस्पून भिजवलेला सब्जा

कृती

सगळ्यात आधी पाणी उकळायला ठेवा आणि त्यात बदाम टाका. पाण्याला ४ ते ५ मिनिटे चांगलं खळखळ उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.

 

पाणी कोमट झालं की त्यातले बदाम काढून घ्या आणि बदामाची सालं काढून टाका.

आता बदाम मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात बदामाच्या तीन पट पाणी टाका आणि मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या. 

प्रजासत्ताक दिन: ३ रंग वापरून केलेल्या ९ 'तिरंगा रेसिपी', बघा तुम्हाला कोणता पदार्थ आवडला

मिक्सरमधून फिरवलेलं मिश्रण गाळून घ्या. हे झालं बदामाचं दूध.

आता हे दूध एका भांड्यात टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात साखर, हळद, जायफळ, केशराचं पाणी, वेलची पूड घाला आणि सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या.

सगळ्यात शेवटी भिजवलेला सब्जा टाका आणि गॅस बंद करा. आता हे गरमागरम बदामाचं दूध पिण्यासाठी तयार आहे.

 

Web Title: How to make almond milk for winter, Badam dudh recipe, Kunal Kapoor special Almond milk recipe, vegan recipe of almond milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.