उन्हाळ्याच्या ऋतूत बाजारांत ताजे - पिवळेधमक आंबे विकायला ठेवलेले असतात. हे चवीला मस्त गोड - पिवळेधमक आंबे पाहून ते विकत घेण्याची इच्छा होतेच. उन्हाळ्यात येणाऱ्या आंब्याची (Aamba Poli Recipe) सगळेचजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. घरी आंब्याची पेटी आल्यावर आपण (How to make aamba poli at home) आंबे तर खातोच सोबतच,आंब्याचे वेगवेगळे पदार्थ देखील हमखास करतोच. आमरस, आंब्याची बर्फी, आईस्क्रीम, कुल्फी असे असंख्य पदार्थ तयार केले जातात. परंतु या पदार्थांसोबतच या सिझनला खास तयार केली जाणारी आंब्याची आंबा पोळी (Aam Papad Recipe) घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते(How to make Aam Papad).
चावीला आंबट - गोड असणारी आंबापोळी खाण्यासारखं दुसरं सुखः नाही. बऱ्याच घरात उन्हळ्याच्या सिझनमध्ये आंब्यांची पोळी हमखास केलीच जाते. काहीवेळा आंबापोळी घरीच करताना ती फसते, चिकट होते किंवा व्यवस्थित तयार होत नाही, अशी बऱ्याच गृहिणींची तक्रार असते. यासाठी आंबापोळी घरच्याघरीच तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. आंब्याचा रस - २ कप
२. पिठीसाखर / साखर - चवीनुसार
३. वेलची पूड - १ टेबलस्पून
४. साजूक तूप - १ टेबलस्पून
आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...
कृती :-
१. सगळ्यांतआधी पिकलेले आंबे स्वच्छ धुवून त्यांच्या बारीक बारीक फोडी करून घ्याव्यात. या फोडी मिक्सरला लावून वाटून घ्याव्यात.
२. आंब्याचा रस मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
३. आता एक पॅन घेऊन पॅनमध्ये तयार आंब्याचा रस ओतून घ्यावा.
४. आंब्याच्या रसात चवीनुसार साखर, वेलीची पूड घालावी. आता चमच्याने हलवून सगळी साखर विरघळवून घ्यावी.
५. साखर विरघळल्यानंतर हे गरम मिश्रण साजूक तूप पसरवून लावलेल्या डिशमध्ये ओतून घ्यावे.
६. आता हे मिश्रण डिशमध्ये व्यवस्थित एकसमान पसरवून घ्यावे. त्याचा एक पातळसर थर तयार करून आंब्याचा पल्प पसरवून घ्यावा.
७. आता या डिश सूर्यप्रकाशात ठेवून संपूर्णपणे वाळवून घ्याव्यात.
८. ही तयार आंबापोळी सुरीने व्यवस्थित काढून घ्या. आंब्याच्या पोळीवर उभ्या लाईन्स करून त्याचे रोल्स तयार करून घ्या.
आंब्याची पोळी खाण्यासाठी तयार आहे. एका हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवून आपण ही आंबापोळी हवी तेव्हा काढून खाऊ शकता.