Join us

भुरभुर पावसात प्या स्पेशल राजवाडी गरमगरम चहा, पाहा ही खास रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2025 09:50 IST

How To Make a Special Rajwadi Chai At Home : Special Rajwadi Tea Recipe : Homemade Rajwadi Chai : Traditional Rajwadi Chai Recipe : नेहमीचा तोच तो चहा पिण्यापेक्षा करा खास राजवाडी चहा..

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. सगळीकडेच मुसळधार पाऊस पडत आहे, अशा गारठ्याच्या वातावरणात कुणी मस्त गरमागरम, वाफाळत्या चहाचा कप पुढ्यात ठेवला तर अजून काय हवं.... पावसाळा आणि गरमागरम चहाचं तसं फार पूर्वीच नातं... आत्तापर्यंत आपण सगळ्यांनीच वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेतला असेल. रोजच्या दुधाच्या चहापासून ते ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा लेमन टी पर्यंत अनेक प्रकार बाजारात सहज (Special Rajwadi Tea Recipe) उपलब्ध असतात. असाच एक वेगळ्या प्रकारचा खास (How To Make a Special Rajwadi Chai At Home) चहा म्हणजे राजवाडी चहा... सोशल मिडीयाच्या माध्यमातून (Homemade Rajwadi Chai) जगाच्या कानाकोपऱ्यातील पदार्थ थेट मिनिटभरात जगभर लोकप्रिय होतात, अशीच काहीशी या राजवाडी चहाची व्हायरल रेसिपी...

नेहमीच्या चहापेक्षा काहीतरी वेगळं आणि खास चवीचं हवं असेल, तर 'राजवाडी चहा' हा एक उत्तम पर्याय आहे. हा चहा फक्त एक पेय नाही, तर एक रॉयल अनुभव आहे. यामध्ये अनेक प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आणि औषधी वनस्पतींचा (Traditional Rajwadi Chai Recipe) वापर केला जातो, ज्यामुळे त्याला एक अनोखी आणि उत्कृष्ट चव मिळते. या चहामध्ये वापरले जाणारे जिन्नस केवळ चवच वाढवत नाहीत, तर आरोग्यासाठीही तितकेच  फायदेशीर असतात. राजस्थानच्या राजवाड्यांतून लोकप्रिय झालेला हा चहा आपल्या समृद्ध चवीसाठी आणि खास सुगंधासाठी ओळखला जातो. वेलची, केशर, दालचिनी, आलं यांचा परिपूर्ण संगम असलेला हा चहा पाहुणचाराची शान वाढवतो आणि मनाला एक खास आठवण देऊन जातो. राजवाडी चहा कसा तयार करायचा, त्यात कोणते खास मसाले वापरले जातात याची सोपी रेसिपी पाहूयात...  

साहित्य :-

१. साखर - १ टेबलस्पून २. पाणी - गरजेनुसार३. चहा पावडर - १ टेबलस्पून ४. बडीशेप - १ टेबलस्पून ५. काळीमिरी - ३ ते ४ दाणे ६. लवंग - ३ ते ४ लवंग काड्या ७. वेलची - ३ छोटी हिरवी वेलची ८. दालचिनी काड्या - १ छोटा तुकडा ९. आलं - १ छोटा तुकडा१० दूध - १ कप  ११. केशर काड्या - ३ ते ४ काड्या 

शिळ्या इडल्यांचे पाहा ८ पदार्थ, खूप इडली उरली तर बिंधास्त करा आणि पोटभर चविष्ट पदार्थ खा...

गोकुळाष्टमी स्पेशल : नैवेद्याला हवाच मनमोहक पारंपरिक पदार्थ, पाहा घरी मोहनथाळ करण्याची सोपी रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यातआधी एका पातेल्यात थोडी साखर घालून घ्यावी. मग या साखरेवर थोडेसे पाणी घालावे. मिश्रण मंद आचेवर विरघळून त्याचे कॅरेमलाईज असे मिश्रण तयार करून घ्यावे. २. मग या मिश्रणात थोडे पाणी आणि चहा पावडर घालावी. त्यानंतर या गरमागरम चहात बडीशेप, काळीमिरी दाणे, लवंग, छोटी हिरवी वेलची दालचिनीचा एक छोटा तुकडा व आलं घालावं. (आपण हे सगळे जिन्नस एकत्रित करून मिक्सरच्या भांड्यातून वाटून त्याची तयार पेस्ट देखील चहात घालू शकता.)

३. सगळ्यात शेवटी मंद आचेवर ठेवून राजवाडी चहाला एक हलकीशी उकळी काढून घ्यावी. मग यात चवीनुसार साखर, केशर काड्या व दूध घालावे. त्यानंतर पुन्हा एकदा चहाला एक हलकीशी उकळी काढून घ्यावी. राजवाडी चहा पिण्यासाठी तयार आहे. 

गरमागरम चहा कपात ओतून वरुन सजावटीसाठी केशर काड्या भुरभुरवून घालाव्यात. मस्त असा गरमागरम राजवाडी चहा पिण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.