Join us

कणिक मळताना ‘हा’ एक सोपा उपाय करा, चपाती कडक अजिबात होणार नाही-पहिल्यांदा करत असाल तरीही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2025 09:40 IST

soft roti tips : how to make soft chapati : best method for kneading dough for chapati : कणिक मळताना गोष्टींची काळजी घेतल्यास चपात्या मऊ होतील आणि व्यवस्थित फुगतील.

भारतीय स्वयंपाकघरात चपाती रोज खाल्ली जाते. चपाती बनवताना अनेकदा महिलांना टेन्शन येतं. पहिल्यांदा चपाती करत असताना प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.(soft roti tips) ती व्यवस्थित लाटली जात नाही. कणिक व्यवस्थित मळले जात नाही. कधी खूप कडक होते तर कधी खूप चिकट.(how to make soft chapati) चपाती लाटताना अनेकदा ती लाटण्याला चिपकते किंवा तव्यावर चिपकून बसते. चपाती भाजताना ती कडक किंवा वातड होते. त्यामुळे नेमकं काय करावं समजत नाही. (chapati dough kneading tips)बरेच महिला आपापल्या पद्धतीने कणिक मळली जाते.(roti making for beginners) कुणी पाणी घालून मळतं तर कुणी दुधाचा वापर करतं. पण कणिक मळताना गोष्टींची काळजी घेतल्यास चपात्या मऊ होतील आणि व्यवस्थित फुगतील. (chapati soft secret) पहिल्यांदा चपाती बनवताना अनेकदा गोलसर चपाती होण्याऐवजी काहीशी विचित्र आकाराची तयार होते. असा अनुभव सगळ्यांना येतो. सरावानेच हाताला वळण येतं. महत्त्वाचं म्हणजे हार न मानणं आणि स्वतःला वेळ देणं.(kitchen hacks for soft roti)

फ्लॉवरच्या भाजीत किडे- अळ्या? चटकन काढण्यासाठी 3 सोप्या टिप्स-वेळही वाचेल खूप

1. कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, ते मळताना त्यात एकाच वेळी खूप पाणी घालू नका. हळूहळू घाला आणि हलक्या हातांनी मळायला सुरुवात करा. नंतर पीठ लवचिक बनवण्यासाठी आपल्या तळहातांचा वापर करा. पीठ जितके लवचिक असेल तितकी मऊ चपाती होईल. 

2. चपातीसाठी कणिक मऊ, अधिक लवचिक पीठ तयार करण्यासाठी गव्हाच्या पीठाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. त्यासाठी भेसळयुक्त गव्हाचे पीठ वापरणे टाळा. 

ना लाटण्याची झंझट ना कणिक मळण्याचं टेंशन, मोजून १० मिनिटांत पराठे करण्याची एक सोपी ट्रिक

3. मऊ पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळल्यानंतर लगेच चपाती लाटू नका. ५ ते १० मिनिटे सुती कापडाने झाकून ठेवा. यामुळे पीठ पाणी आणि ग्लूटेन पूर्णपणे शोषून घेते, ज्यामुळे पीठ मऊ होते. 

4. आपल्याला जर चपाती अधिक मऊ ठेवायची असेल तर कणिक मळण्याआधी पाणी आणि गव्हाचे पीठ हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यासोबत तेल सुद्धा थोडे गरजेचे आहे. कणिक मळून झाल्यानंतर त्यात तेलाचे काही थेंब घाला. ज्यामुळे चपाती अधिक वेळ मऊ राहिल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Simple trick for soft chapatis, even for beginners.

Web Summary : For soft chapatis, knead dough slowly with good quality flour. Rest the dough covered for 5-10 minutes. Add a few drops of oil while kneading. This ensures softer, fluffier chapatis every time.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.