Lokmat Sakhi >Food > फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडून कडक होते? १ सोपा उपाय- कणिक राहील मऊसूत, फ्रेश

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडून कडक होते? १ सोपा उपाय- कणिक राहील मऊसूत, फ्रेश

Kitchen Tips For The Storage Of Leftover Atta Or Dough: फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडून कोपऱ्याला ती कडक होत जाते. असं होऊ नये म्हणून काय करावं पाहा..(How to Keep leftover Chapati Dough Fresh For Long?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2025 13:31 IST2025-05-12T13:30:22+5:302025-05-12T13:31:34+5:30

Kitchen Tips For The Storage Of Leftover Atta Or Dough: फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडून कोपऱ्याला ती कडक होत जाते. असं होऊ नये म्हणून काय करावं पाहा..(How to Keep leftover Chapati Dough Fresh For Long?)

How to Keep leftover Chapati Dough Fresh For Long, kitchen tips for the storage of leftover atta or dough  | फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडून कडक होते? १ सोपा उपाय- कणिक राहील मऊसूत, फ्रेश

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडून कडक होते? १ सोपा उपाय- कणिक राहील मऊसूत, फ्रेश

Highlightsभिजवलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?

रोजचा स्वयंपाक करताना अनेक जणी घरातल्या माणसांची संख्या बघुनच त्या प्रमाणात कणिक घेतात आणि भिजवतात. पण कधी कधी असं कणिकेचं प्रमाण हुकतं आणि गरजेपेक्षा जास्त कणिक घेऊन भिजवली जाते. कणिक उरली की साहजिकच आपण ती फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा ८ ते १० तासांनी आपण ती कणिक जेव्हा फ्रिजमधून बाहेर काढतो तेव्हा ती थोडीशी काळी पडलेली दिसते. शिवाय काही ठिकाणी कणिक अगदी कडक झालेली असते. अशी कडक झालेली कणिक मग काढून टाकावी लागते. म्हणूनच जर कधी तुम्हाला भिजवलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवण्याची वेळ आलीच तर पुढील पद्धतीने ठेवा (kitchen tips for the storage of leftover atta or dough). यामुळे कणिक अजिबात काळी पडून कडक होणार नाही.(How to Keep leftover Chapati Dough Fresh For Long?) 

 

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडून कडक होऊ नये म्हणून....

भिजवलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी माहिती देणारा व्हिडिओ zatpat05 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की त्यासाठी एक स्वच्छ धुतलेला सुती कपडा घ्या. 

रात्री लवकर झोप येतच नाही? ५ रोपं तुमच्या बेडरुममध्ये ठेवा- भरपूर ऑक्सिजन मिळून शांत झोपाल..

तो कपडा थोडा ओलसर करून घ्या. आता कणिकेचा गोळा त्या ओलसर कपड्यामध्ये गुंडाळा आणि एखादे पक्के झाकण लागणाऱ्या स्टीलच्या डब्यात ठेवा. ज्या डब्यात तुम्ही कणिक ठेवणार आहात त्या डब्याचे झाकण मुळीच सैलसर नको. अन्यथा बाहेरची हवा लागून कणिक कडक होऊन काळी पडू शकते.

 

कणिक साठविण्यासाठी तुम्ही एअरटाईट डबे वापरले तरी चालेल...

हे देखील लक्षात घ्या..

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या काळसर तसेच वातड होतात असा अनेक जणींचा अनुभव आहे.

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

असं होऊ नये म्हणून फ्रिजमधली कणिक बाहेर काढून ठेवल्यावर लगेच तिच्या पोळ्या करू नका. आधी कणिक थोडी रुम टेम्परेचरला येऊ द्या. त्यानंतर मग तिला थोडंसं तेल लावून चांगलं मळून घ्या आणि त्यानंतरच तिच्या पोळ्या करा. 


 

Web Title: How to Keep leftover Chapati Dough Fresh For Long, kitchen tips for the storage of leftover atta or dough 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.