उन्हाळ्याच्या दिवसांत सगळीकडेच उन्हाचा पारा वाढलेला असतो. त्याचा परिणाम फळं आणि भाज्यांवरही दिसून येतो. हिवाळ्यात अगदी स्वस्त आणि फ्रेश मिळणाऱ्या पालेभाज्या उन्हाळ्यात खूप महाग झालेल्या असतात. कारण त्या लवकर सुकतात, कोमेजून जातात. म्हणूनच उन्हाळ्यात जेव्हा आपण पालेभाज्या विकत घेताे, तेव्हा त्या फ्रिजमध्ये ठेवताना थोडी काळजी घ्यायला हवी. नाहीतर त्या लवकर खराब होतात. म्हणूनच पालेभाज्यांच्या बाबतीत नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहुया..(how to keep leafy vegetables fresh for long in summer?)
उन्हाळ्यात पालेभाज्या लवकर खराब होऊ नयेत म्हणून...
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पालेभाजी खरेदी करतानाच ती एकदा व्यवस्थित पाहून घ्यावी. कारण या दिवसांत बऱ्याचदा सुकलेल्या भाज्या विकल्या जातात.
हलवाईकडे मिळते तशी परफेक्ट बुंदी घरीच करण्याची एकदम सोपी रेसिपी, बुंदी लगेच करून पाहाल
२. भाजी खरेदी केल्यानंतर ती तशीच बराच वेळ बाहेर ठेवायची आणि नंतर मग निवडून फ्रिजमध्ये ठेवायची, अश सवय अनेकींना असते. हे उन्हाळ्यात टाळायला हवं. भाजी घेतल्यानंतर लगेच ती निवडा आणि फ्रिजमध्ये ठेवा. जर तुम्हाला लगेचच भाजी निवडून फ्रिजमध्ये ठेवणं शक्य नसेल तर ती एखाद्या ओलसर कपड्यात गुंडाळून ठेवा.
३. भाजी निवडत असताना त्यात एखादं ओलसर, खराब झालेलं पान असेल तर ते लगेच बाजुला काढून टाका. कारण त्यामुळे बाकीची भाजी लवकर खराब होऊ शकते.
'हे' पदार्थ रोज खाणं सुरू करा, वाढलेली चरबी झरझर कमी होऊन दिसाल चवळीची नाजुक शेंग
४. भाजी साठवून ठेवण्यासाठी एअर टाईट कंटेनर वापरा. ते काचेचे असल्यास जास्त चांगले. कंटेनरमध्ये सगळ्यात खाली पेपर नॅपकिन ठेवा. त्यावर निवडलेली भाजी अलगदपणे ठेवा. भाजी जास्त दाबून भरू नका. अशा पद्धतीने ठेवलेली भाजी ७ ते ८ दिवस चांगली टिकते.
५. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून पालेभाज्या ठेवू नका. कारण या पद्धतीने त्या ठेवल्या तर लवकर खराब होतात.
Web Summary : Leafy vegetables spoil quickly in summer. Buy fresh, sort immediately, and refrigerate in an airtight container with a paper towel. Avoid plastic bags; this keeps greens fresh for up to 8 days.
Web Summary : गर्मी में पत्तेदार सब्जियां जल्दी खराब हो जाती हैं। ताजा खरीदें, तुरंत छाँटें, और पेपर टॉवल के साथ एयरटाइट कंटेनर में फ्रिज में रखें। प्लास्टिक बैग से बचें; इससे साग 8 दिनों तक ताजा रहता है।