Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात गूळ दगडासारखा कडक होतो? गूळ मऊ करण्यासाठी ४ टिप्स- वर्षभर टिकेल, काळाही पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2025 14:02 IST

Jaggery storage tips: How to keep jaggery soft: Jaggery hard in winter: आपण काळजी घेतल्यास गूळ वर्षभर मऊ, ताजा आणि चवदार राहू शकतो.

हिवाळा सुरु झाला की अनेक घरांमध्ये तक्रार सुरु होते, गूळ दगडासारखा कडक होतो. सुरुवातीला मऊ, रसाळ आणि सुवासिक असलेला गूळ काही दिवसांतच इतका कठीण होतो की सुरीने कापणंही अवघड वाटू लागतं.(Jaggery storage tips) चहा, पोळी, पुरणपोळी, लाडू किंवा आरोग्यदायी पदार्थांसाठी गूळ रोज वापरला जातो, पण कडक झाल्यावर त्याची चव, रंग सगळंच बिघडतं.(How to keep jaggery soft) अनेकदा गूळ काळा पडतो, ओल येते किंवा बुरशीसारखा वासही येऊ लागतो.(Jaggery hard in winter)गूळ कडक होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे हवामानातील बदल आणि चुकीची साठवण. हिवाळ्यात वातावरण कोरडं असल्यामुळे गुळातील नैसर्गिक ओल हळूहळू कमी होते. त्याचबरोबर उघड्यावर ठेवलेला गूळ हवा, ओलावा किंवा तापमानातील बदल पटकन शोषून घेतो. यामुळे गूळ घट्ट होतो, त्याचा रंग बदलतो आणि चवही कमी होते.गूळ मऊ ठेवण्यासाठी कोणत्याही महागड्या उपायांची गरज नसते. घरच्या घरी, स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून गूळ दीर्घकाळ मऊ ठेवता येतो. काहीजण हा गूळ पुन्हा वापरण्याऐवजी फेकून देतात, पण काळजी घेतल्यास गूळ वर्षभर मऊ, ताजा आणि चवदार राहू शकतो. 

केमिकल्सनी केसांची वाट- टक्कल पडायची वेळ आली? आठवड्यातून १ वेळा ‘हा’ हेअर मास्क लावा, केस गळणं होईल कमी

1. गूळ मऊ करण्यासाठी मायक्रोवेव्हची प्लेट घ्या. त्यावर गुळाचा खडा ठेवा आणि मायक्रोवेव्ह करा. २५० ग्रॅम गुळासाठी सुमारे १ ते १.५ मिनिटे ठेवा. त्यामुळे गूळ लवकर मऊ होण्यास मदत होईल. त्यानंतर आपण सुरीने त्याला व्यवस्थित कापला जाईल. 

2. आपल्याला गुळाचा बारीक पावडरमध्ये बारीक करु शकता. गूळ किसण्याऐवजी किसणीला थोडे तूप किंवा तेल हलकेच लावा. यामुळे गूळ किसणीला चिकटणार नाही. यामुळे गूळ लवकर मऊ होतो. 

3. जर गूळ खूप कडक असेल तर स्वच्छ कापडात किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. कापडावर जाड रोलिंग पिन किंवा ग्राइंडिंग स्टोनने मारा. कापडाच्या आत ठेवल्याने गुळाचे तुकडे तुटतील. आणि गूळ मऊ होण्यास मदत होईल.

4. गूळ वितळवण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये न ठेवता डबल बॉयलर पद्धतीचा वापर करा. त्यासाठी भांड्यात पाणी ठेवा. त्यावर गुळाचे तुकडे असलेले लहान भांडे ठेवा. वाफेमुळे गूळ हळूहळू मऊ होईल. ज्यामुळे गुळाचे पाक तयार होण्यास मदत होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Keep Jaggery Soft This Winter: Simple Tips for Year-Round Freshness

Web Summary : Winter hardens jaggery due to dryness and improper storage. Keep it soft using microwave, grating with ghee, rolling in cloth, or double boiler method. These easy kitchen tips ensure year-long freshness and flavor.
टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स