Tips To Stop Honey From Crystallizing: मधाला सुपरफूड मानलं जातं. औषधोपचारांपासून ते पूजाविधीपर्यंत मधाचा वापर केला जातो. जवळपास प्रत्येक घरातील किचनमध्ये मध हमखास आढळतं. काही लोक गोडव्यासाठी साखरेऐवजी मधाचा वापर करतात. मात्र हिवाळा सुरू होताच जास्त थंडीमुळे मध घट्ट होऊ लागतं. अनेकदा थंडीमध्ये मध इतकं गोठतं की अगदी तुपासारखं कडक होतं. अशावेळी मध वापरणं अवघड जातं, खासकरून जर ते अरुंद तोंडाच्या बाटलीत साठवलेलं असेल तर. छोट्या तोंडामुळे आत चमचाही जात नाही. अशा परिस्थितीत मध गोठू नये यासाठी एक सोपी आणि मजेशीर ट्रिक आहे. या ट्रिकमुळे हिवाळ्यातही मध सहज वापरता येतं.
मध गोठू होऊ नये यासाठी काय करावे?
मध घट्ट होऊ नये किंवा गोठू होऊ नये यासाठी फार मेहनत घ्यायची गरज नाही. यासाठी फक्त लवंग लागते. ज्या बाटली किंवा बरणीत मध ठेवलं आहे, त्यात ४–५ लवंगा टाका. लवंग कुटू किंवा तोडू नका, जशा आहेत तशाच मधात टाका. जर लवंग मधात आत जात नसतील, तर चमच्याच्या मदतीने हलकेच दाबा, म्हणजे त्या मधात बुडतील. आता हे मध ठेवून द्या. वर्षानुवर्षे हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा काहीही असो मध तसंच राहील आणि कधीच गोठणार नाही.
मध आणि लवंगाचे फायदे
या ट्रिकची खास गोष्ट म्हणजे लवंगाचा वास मधाला येत नाही. लवंग आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. खोकल्यामध्ये मध आणि लवंग एकत्र खाल्ल्यास खूप आराम मिळतो. हिवाळ्यात हे मध मुलांना देऊ शकता. मध खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मुलांना दूधात मध घालून देणे फायदेशीर ठरते.
मध केस आणि त्वचेसाठीही वरदान आहे. त्वचा हायड्रेट व मॉइश्चराइज ठेवण्यासाठी मधाचा वापर केला जातो. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घेतल्यास वजन कमी होण्यासही मदत होते.
