Join us

पनीर तळल्यानंतर रबरासारखे चिवट होते? १ साधीसोपी ट्रिक - तळल्यानंतरही पनीर राहील मऊमुलायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 14:16 IST

Softest Fried Paneer Hack without even deep frying : How to keep Fried Paneer Soft : How To Make Paneer Soft After Frying : How To Keep Paneer Soft After Frying : पनीर फ्राय करून घेतल्यानंतर, खाताना चिवट लागू नये यासाठी एक स्पेशल टीप...

'पनीर' हा एक असा पदार्थ आहे की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं खायला आवडतो. बरेचदा आपण घरी पनीरचे वेगवेगळे पदार्थ तयार करून मस्त ताव मारतो. या पदार्थांमध्ये (How to keep Fried Paneer Soft) शक्यतो आपण पनीरच्या भाज्यांचं जास्त प्रमाणात करतो. हॉटेल स्टाईल चमचमीत, झणझणीत पनीरची भाजी करायची म्हटलं (How To Make Paneer Soft After Frying) तर सर्वात आधी पनीर तेलावर हलकेसे तळून घ्यावे लागते. पनीर तेलावर तळून घेतल्याने त्याची चव अधिकच छान लागते, सोबतच भाजीची देखील चव वाढते(How To Keep Paneer Soft After Frying).  

मटार पनीर, ढाबा स्टाइल पनीर मसाला, पनीर अंगारा, कोल्हापुरी पनीर, पनीर घी रोस्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करताना आपण हमखास पनीर शॅलो फ्राय करतो. परंतु पनीर अशा पद्धतीने फ्राय केल्यावर ते थोडे चिवट होते व खाताना रबरासारखे लागते. असे चिवट पनीर नीट चावता येत नाही, यामुळे पनीरची भाजी चवीला कितीही टेस्टी झाली असली तरी ती खाण्याची इच्छाच होत नाही. अशावेळी नेमकं काय करावं हे सुचत नाही. याचबरोबर, इतके महागामोलाचे पनीर मनमुरादपणे चव घेत खाण्याचा आनंद देखील घेता येत नाही. यासाठीच, पनीरची कोणतीही डिश तयार करताना जर पनीर फ्राय करून घेणार असाल, तर ते खाताना चिवट लागू नये यासाठी एक स्पेशल टीप नक्की फॉलो करा. 

पनीर तळल्यानंतर रबरासारखे चिवट होऊ नये म्हणून... 

पनीरचे वेगवेगळे पदार्थ तयार करताना आपण काहीवेळा पनीर हलकेसे तळून घेतो. परंतु पनीर तळल्यावर चिवट रबरासारखे होते, असे होऊ नये यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात.

सांडगी मिरचीतला मसाला निघू नये म्हणून २ सोप्या ट्रिक्स - खराब न होता वर्षभर टिकेल चांगली, चवीला झणझणीत...

इवल्याशा गुळाच्या खड्याचे करा थंडगार सरबत! थकवा जाईल पळून, प्या गूळ सरबत...

पनीर तळल्यानंतर ते रबरासारखे चिवट होऊ नये यासाठी पनीरचे तुकडे तळल्यानंतर ते लगेचच हलक्या गरम पाण्यांत टाकावेत. यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये कोमट गरम पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालावे. या पाण्यांत तळून घेतलेले पनीरचे तुकडे टाकावेत. त्यानंतर १५ ते २० मिनिटे पनीर पाण्यांत भिजत ठेवावेत. १५ मिनिटानंतर पनीरचे तुकडे पाण्यातून काढून आपल्याला हवा तो पदार्थ आपण तयार करु शकतो. या छोटाशा ट्रिकमुळे पनीर फ्राय केल्यानंतर देखील खाताना आधीसारखेच मऊ, मुलायम लागते.    

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. पनीर तळताना ते जास्त वेळ किंवा जास्त उष्णतेवर तळू नका. फक्त दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळा म्हणजे ते खाताना चिवट लागणार नाही. 

२. पनीरच्या तुकड्यांचा आकार देखील मध्यम ठेवावा. जास्त लहान किंवा मोठे तुकडे केल्यास ते व्यवस्थित तळले जात नाही, यामुळे ते खाताना चिवट लागू शकतात. 

३. पनीर तळताना तेलाचे तापमान योग्य असावे. जास्त गरम किंवा थंड तेलात पनीर तळल्याने ते चिवट होऊ शकते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स