Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > शहाळ्यात भरपूर पाणी आहे, ते गोडच आहे हे ओळखण्याची पाहा पैसावसूल ट्रिक, परफेक्ट शहाळं निवडाल..

शहाळ्यात भरपूर पाणी आहे, ते गोडच आहे हे ओळखण्याची पाहा पैसावसूल ट्रिक, परफेक्ट शहाळं निवडाल..

How to identify sweet water coconut: अनेकांना गोड पाण्याच्या नारळाची ओळख पटवण जमत नाही. त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून आपण गोड पाणी असलेलं नारळ निवडू शकाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:15 IST2026-03-13T10:19:16+5:302026-03-13T19:15:53+5:30

How to identify sweet water coconut: अनेकांना गोड पाण्याच्या नारळाची ओळख पटवण जमत नाही. त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून आपण गोड पाणी असलेलं नारळ निवडू शकाल.

How to identify sweet water coconut, follow these tips while buying | शहाळ्यात भरपूर पाणी आहे, ते गोडच आहे हे ओळखण्याची पाहा पैसावसूल ट्रिक, परफेक्ट शहाळं निवडाल..

शहाळ्यात भरपूर पाणी आहे, ते गोडच आहे हे ओळखण्याची पाहा पैसावसूल ट्रिक, परफेक्ट शहाळं निवडाल..

How to identify sweet water coconut: निसर्गाने आपल्याला दिलेलं नारळ हे फळ आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कारण नारळातील पाणी प्यायल्याने कितीतरी फायदे मिळतात. हेल्थ एक्सपर्ट तर नियमितपणे नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत राहतात. आपणही अनेकदा नारळ पाणी पित असाल आणि असंही जाणवलं असेल की, नारळाचं पाणी गोड लागलं तरच पिण्यात जास्त मजा येते. नारळात पाणी भरपूर निघावं आणि गोड असावं असं सगळ्यांनाच वाटतं. मग लोक स्वत:च दुकानदाराला नारळ निवडून देतात. पण अनेकांना गोड पाण्याच्या नारळाची ओळख पटवण जमत नाही. त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून आपण गोड पाणी असलेलं नारळ निवडू शकाल.

नारळाचा रंग 

डार्क हिरवे किंवा मग हलक्या पिवळ्या रंगाचे नारळ सगळ्यात चांगले मानले जातात. फार जास्त ब्राउन किंवा मग डाग असलेलं नारळ घेणं टाळावं. हे नारळ जुने असतात. तसेच नारळ खरेदी करण्याआधी कानाजवळ घेऊन हलवून नक्की बघा. जर पाणी हलण्याचा आवाज ऐकू आला, तर समजा नारळात पाणी भरपूर आहे.

नारळाचे डोळे चेक करा

आपण पाहिलं असेल की, नारळावर तीन निशाण असतात. त्यांना नारळाचे डोळे असंही म्हटलं जातं. हे डोळे दाबून बघायचे. जर नारळाच्या या डोळ्यात ओलावा असेल किंवा ते नरम जाणवत असेल तर याचा अर्थ आहे की, नारळात पाणी गोड आहे. अशाप्रकारे नारळ खरेदी करू शकता.

आकार आणि वजन

जास्तीत जास्त लोक असाच विचार करतात की, नारळाचा आकार मोठा असेल पाणी जास्त असेल. पण असं काही नक्की नाही. गोल नारळाऐवजी थोडे कोनिकल आकाराचे म्हणजे शंकूच्या आकाराच्या नारळात मलाई कमी आणि पाणी जास्त असण्याची शक्यता असते. त्याशिवाय नारळ खरेदी करण्याआधी त्याचं वजन चेक करा. जर नारळ हलकं वाटत असेल तर कदाचित पाणी सुकलेलं असू शकतं.

Web Title : मीठा नारियल पानी कैसे चुनें: ये हैं खरीदारी के आसान टिप्स!

Web Summary : मीठा नारियल पानी चाहिए? गहरे हरे/हल्के पीले नारियल चुनें। 'आंखों' में नमी जांचें। शंक्वाकार आकार में अक्सर अधिक पानी होता है। भारी नारियल में अधिक पानी होता है। सबसे अच्छे स्वाद के लिए भूरे या क्षतिग्रस्त नारियल से बचें।

Web Title : How to pick sweet coconut water: Smart buying tips revealed!

Web Summary : Want sweet coconut water? Choose dark green/light yellow coconuts. Check for moisture in the 'eyes'. Conical shapes often have more water. Heavier coconuts indicate more water content. Avoid overly brown or damaged ones for best taste.