'दररोज एक सफरचंद खाल्ल्याने, आजार आणि डॉक्टर यांपासून लांब राहू शकतो',अशी प्रसिद्ध म्हण आपल्याकडे आहे. सफरचंद हे सर्वाधिक खाल्ले जाणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर (How to Identify Chemically Ripened Apple – Know Tricks) मानले जाणारे फळ आहे. आपण हमखास बाजारांत गेलो की, ठेल्यावर विकायला ठेवलेली लालचुटक सफरचंद विकत घेतोच. ही मस्त लालेलाल, ताजी सफरचंद पाहून ती विकत घेऊन खाण्याचा मोह आपल्याला ( ways to detect fake apples) आवरता येत नाही. परंतु आजकाल बाजारांत फार मोठ्या प्रमाणांत केमिकल्सयुक्त सफरचंद अगदी अगदी सर्रास विकली जातात(tricks to spot chemical coated apples).
आपण देखील ही सफरचंद बाहेरुन दिसायला चांगली म्हणून विकत घेतो. सफरचंद बाहेरुन चांगली दिसण्यासाठी, त्याचा रंग लालचुटुक, चमकदार दिसावा तसेच दीर्घकाळ टिकवण्यासाठी अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया त्यावर केल्या जातात. अशी केमिकलयुक्त सफरचंद दीर्घकाळ खाल्यास आरोग्यास अपायकारक ठरू शकते. त्यामुळे नैसर्गिक व चांगल्या (how to check apple purity at home) प्रतीची सफरचंद ओळखण्यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाजारांतून विकत आणलेली सफरचंद केमिकल्सयुक्त आहेत की नाही हे तपासण्यासाठी घरच्याघरीच करता येतील अशा ४ सोप्या ट्रिक्स पाहूयात.
तुम्ही खात असलेले सफरचंद केमिकसयुक्त आहे की नाही, कसे ओळखालं ?
१. सालीवरुन ओळखा :- सफरचंद रसायनयुक्त पदार्थांच्या मदतीने पिकवलं आहे का, हे त्याच्या सालींवरुन सहज ओळखता येतं. जर सफरचंदाचं साल खूपच लालसर, गुळगुळीत आणि अतिशय चमकदार दिसत असेल, तर ते रसायन वापरून पिकवलेलं असण्याची शक्यता असते. नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या सफरचंदाचा रंग थोडा हिरवा आणि लालसर मिश्रित असतो आणि त्यावर नैसर्गिक बारीक अशा रेषा असतात. अशा सफरचंदाचं साल सामान्य दिसतं आणि त्याला आर्टिफिशियल रंग किंवा कृत्रिम चमक नसते.
२. पाण्यांत टाकून पाहा :- सफरचंद नैसर्गिक आहे की केमिकल्सयुक्त, हे आपण पाण्याच्या मदतीने देखील लगेच ओळखू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात सफरचंद टाका. जर सफरचंद पाण्यात बुडालं, तर ते नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहे असे समजावे. अशा सफरचंदाचं वजन अधिक असतं आणि त्यावर वॅक्स कोटिंग नसतं. जर सफरचंद पाण्यावर तरंगलं, तर ते हलकं आणि वॅक्स किंवा केमिकलने कोटेड असण्याची शक्यता असते.
३. चवीवरून ओळखा :- नैसर्गिकरित्या पिकवलेलं सफरचंद खाल्ल्यावर त्यामध्ये हलकीशी गोडसर आणि ताजेपणाची चव असते. याउलट, केमिकलने पिकवलेल्या सफरचंदाची चव थोडी वेगळी आणि काहीशी आर्टिफिशियल लागते आणि खाल्ल्यावर लगेच वेगळेपणा जाणवतो.
४. सुगंधा वरुन ओळखा सफरचंद :- सफरचंद नैसर्गिक आहे की केमिकल्सयुक्त, हे कापल्यावर येणाऱ्या वासावरून सहज ओळखता येतं. जर सफरचंद नैसर्गिक असेल, तर त्यातून ताजेपणाचा, हलकासा गोडसर असा सुगंध येतो. पण जर सफरचंद रासायनिक पद्धतीने पिकवलं असेल, तर त्यातून एक वेगळाच, कृत्रिम वास येतो, काहीवेळा थोडीशी दुर्गंधही जाणवू शकते.