दिवाळीचे दिवस आले की बहुतांश लोक त्यांच्या जवळच्या नातलगांना, मित्रमंडळींना मिठाईचे बॉक्स देतात. सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी खूप जास्त वाढलेली असते. ती पुरविण्यासाठी विक्रेते त्यात वाटेल ते पदार्थ घालून प्रचंड भेसळ करतात. त्यात असणारे केमिकल्स आरोग्यासाठी अतिशय त्रासदायकही ठरू शकतात. त्यामुळेच सणासुदीच्या दिवसांत खरं तर पनीर, खवा, मिठाई असे पदार्थ घेणं टाळायलाच हवं (How To Identify Adulteration in Paneer and Khoya?). पण जर ते तुम्ही घरी आणलेच असतील तर घरच्याघरी काही चाचण्या करून त्यांची शुद्धता तपासून घ्यायला मात्र विसरू नका.(how to check purity of khoya and paneer?)
पनीरमधली भेसळ कशी ओळखायची?
१. जे पनीर चावल्यानंतर रबरासारखं चिकट किंवा ताणल्या जात आहे, असं वाटतं ते भेसळीचं समजावं.
२. पनीरचा एक तुकडा हातावर घ्या आणि दोन्ही हातांनी त्यावर हलकाचा दाब देऊन चोळा. पनीर तुटलं नाही तर ते शुद्ध आहे असं समजावं. जर पनीर लगेचच मोकळं होऊन तुटत असेल तर त्यात भेसळ आहे.
३. शुद्ध पनीरचा रंग अगदी पांढरा शुभ्र आणि सुवास दुधासारखा असतो. भेसळीच्या पनीरचा रंग पिवळसर दिसून येतो. शिवाय त्याला सुवासही नसतो.
नाश्ता करताना 'या' चुका कराल तर पोट बिघडणारच! बघा गॅसेस, ॲसिडीटी, अपचन होण्याची कारणं..
४. पनीर घरी आणल्यानंतर ते पाण्यात टाकून उकळवा. नंतर पाण्यातून बाहेर काढा. त्यावर आयोडिनचे काही थेंब टाका. पनीरचा रंग निळसर झाला तर त्यात भेसळ आहे असे समजावे. शुद्ध पनीरचा रंग आयोडिन टाकल्याने बदलत नाही.
५. सोयाबीन पावडर वापरूनही पनीरची शुद्धता ओळखता येते. यासाठी पनीर पाण्यात उकळून घ्या. पाण्यातून बाहेर काढा. हलकासा दाब देऊन त्यातले पाणी काढून घ्या. त्यावर सोयाबीन पावडर शिंपडा. १० मिनिटांनी तपासून पहा. पनीरचा रंग बदलून हलकासा लाल झाला असेल, तर ते भेसळीचं आहे. शुद्ध पनीरचा रंग बदलत नाही.
खव्यामधली भेसळ कशी ओळखायची?
१. भेसळयुक्त खवा हातावर घासल्यास घाण वास येतो, तसेच भेसळ असलेला खवा खाल्ला की तो टाळुला चिकटतो.
२. खवा शुध्द आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडा खवा हातावर घेऊन घासून बघावा.
अस्सल पैठणी घेणं परवडत नाही? स्वस्तात घ्या सुंदर कॉटन पैठणी- एकापेक्षा एक आकर्षक रंग
हात तेलकट झाले आणि हाताला शुध्द तुपासारखा वास आला म्हणजे खवा शुध्द आहे हे समजावं.
३. चमचाभर खवा घ्या तो एक कप गरम पाण्यात मिसळा. नंतर त्यामधे आयोडीनचे काही थेंब टाका. आयोडीन टाकल्यानंतर खवा जर निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ झाली आहे हे समजावं.