Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > दुधावर येईल घट्ट, जाड साय! दूध उकळताना चिमूटभर घाला १ सिक्रेट पदार्थ - भरपूर साय साठवून करा मस्त तूप...

दुधावर येईल घट्ट, जाड साय! दूध उकळताना चिमूटभर घाला १ सिक्रेट पदार्थ - भरपूर साय साठवून करा मस्त तूप...

How to get thick malai on milk : How to get thick malai on milk by using rice : दुधावर जाड, घट्ट, दाटसर साय येण्यासाठी करुन पाहा १ खास घरगुती साधीसोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2025 10:05 IST2025-11-23T10:00:05+5:302025-11-23T10:05:01+5:30

How to get thick malai on milk : How to get thick malai on milk by using rice : दुधावर जाड, घट्ट, दाटसर साय येण्यासाठी करुन पाहा १ खास घरगुती साधीसोपी ट्रिक...

how to get thick malai on milk How to get thick malai on milk by using rice | दुधावर येईल घट्ट, जाड साय! दूध उकळताना चिमूटभर घाला १ सिक्रेट पदार्थ - भरपूर साय साठवून करा मस्त तूप...

दुधावर येईल घट्ट, जाड साय! दूध उकळताना चिमूटभर घाला १ सिक्रेट पदार्थ - भरपूर साय साठवून करा मस्त तूप...

घरी आणलेल्या दुधावर जाड, घट्टसर साय जमा झालेली पाहणे हा गृहिणींसाठी एक प्रकारचा लहानसा आनंदच असतो. ही साय फक्त चवीलाच छान नसते, तर त्यापासून तयार केलेले तूप आणि ताक देखील उत्तम चवीचे तयार होते. गरमागरम दुधावर जमा होणारी साय फक्त चवीलाच नाही तर ती पौष्टिक देखील असते. दुधावर साचलेल्या सायीत चांगले फॅट्स, प्रोटीन आणि त्वचा व शरीरासाठी उपयुक्त घटक असतात(how to get thick malai on milk).

अनेकदा बाजारातून आणलेल्या दुधाला उकळले तरी त्यावर पातळ साय जमा होते किंवा फुटते तर कधी अजिबातच साय येत नाही. दुधाचा प्रकार कोणताही असो, दूध गायीचे असो किंवा म्हशीचे काही सोप्या आणि खास पारंपरिक पद्धती वापरून आपण दुधावर भरपूर आणि जाड थर असलेली साय जमा करू शकतो. दुधावर जास्त प्रमाणांत साय येण्यासाठी दूध कसे उकळावे, ते थंड कसे करावे आणि साठवण्याची योग्य पद्धत काय आहे यांसारख्या साध्यासोप्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. दुधावर जाड, घट्ट आणि भरपूर साय येण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात.. 

दुधावर येईल जाड, दाटसर व घट्ट साय... 

१. दूध उकळण्याची योग्य पद्धत आणि सिक्रेट ट्रिक :- सर्वात आधी दूध एका स्वच्छ भांड्यात गाळून घ्या. साधारणपणे दीड लीटर दुधात अर्धा ग्लास पाणी घाला. पाणी मिसळल्यामुळे दूध थेट भांड्याच्या तळाशी लागून जळत नाही आणि हळूहळू गरम होते. दूध गॅसवर गरम करायला ठेवण्यापूर्वी, भांड्याच्या कडांना थोडेसे तूप बोटाने लावा. यामुळे दूध उकळून गॅसवर सांडत नाही. दूध गरम करत असताना त्यात थोडेसे तांदळाचे दाणे घाला आणि चमच्याने मिक्स करा. हे तांदुळाचे दाणे (How to get thick malai on milk by using rice) दुधावरील साय घट्ट व दाटसर आणि जाडसर येण्यास मदत करते.

चहाचा घोट घेताच मन होईल तृप्त! चिमूटभर 'हा' चहा मसाला घाला - थंडी जाईल पळून मिळेल ऊब... 

 

२. गॅसच्या मंद आचेवर दूध उकळणे :- दूध मंद आचेवर की अगदी हाय फ्लेमवर गरम केले आहे यावरून दुधावर जाड साय येणार की पातळ हे अवलंबून असते. जेव्हा दूध उकळून वर येऊ लागेल, तेव्हा गॅसची आच लगेच मंद करा. जर दूध हाय फ्लेमवर उकळवले, तर त्याची साय पातळ होते. यासाठी दूध कायम मंद आचेवर काहीवेळ उकळू द्यावे. यामुळे दुधाचा दाटसरपणा वाढतो, जो जाड साय येण्यासाठी उत्तम आहे.

पुलाव, बिर्याणी ओलसर होते, चिकट, गचका होऊन लगदाच होतो? ५ टिप्स - प्रत्येक दाणा दिसेल मोकळा,सुटसुटीत...   

३. दूध थंड करण्याची योग्य पद्धत :- दूध चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर, गॅस बंद करा. दूध लगेच झाकणाने झाकू नका. त्याऐवजी, दुधाचे भांडे जाळीदार किंवा छिद्र असणाऱ्या चाळणीच्या मदतीने झाका. चाळणीने झाकल्यामुळे वाफ बाहेर पडत राहते, वाफ बाहेर पडत राहिल्याने साईच्यावर पाण्याचे थेंब जमा होत नाहीत आणि साय अगदी कोरडी व जाड तयार होते. दूध पूर्णपणे थंड झाल्यावर आणि नॉर्मल तापमानाला आल्यावर ते साधारणपणे ४ ते ५ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.

'या' ५ भाज्या वारंवार गरम केल्यास होतात विषासमान! खाणं बेतू शकते जीवावर - वेळीच टाळा ही चुकीची सवय...

४. साय काढण्याची आणि साठवण्याची पद्धत :- साय काढण्याची पद्धत अशी असावी की, ती तुटणार नाही आणि तिचा संपूर्ण थर एकत्र बाहेर काढता येईल. यासाठी, भांडे फ्रिजमधून बाहेर काढा. सर्वात आधी, एका चमच्याच्या किंवा चाकूच्या मदतीने सायीचे किनारे हळूहळू भांड्यापासून वेगळे करा. यानंतर, एक मोठा आणि सपाट चमचा घ्या आणि सायीचा संपूर्ण थर एकत्र आणि काळजीपूर्वक उचला. ही जाड साय एका हवाबंद डब्यात भरुन स्टोअर करून फ्रीजरमध्ये ठेवा.

हा सोपा उपाय तुम्हाला फक्त जाड, घट्ट व दाटसर सायच देत नाही, तर अनेक प्रकारे बचत देखील करतो. साय जाड आल्यामुळे, कमी दुधाच्या सायीमधूनही अधिक प्रमाणात तूप निघते. यूट्यूबर पुष्पा यांच्या मते, केवळ ३ दिवसांच्या सायीपासून १ किलो तूप काढले जाऊ शकते.

Web Title : दूध पर मोटी मलाई: घी के लिए गुप्त नुस्खा

Web Summary : दूध पर मोटी मलाई पाने के लिए यह आसान उपाय आजमाएं: कम आंच पर उबालते समय चावल डालें। ठंडा करें, बिना ढके फ्रिज में रखें, और घर के बने घी के लिए मलाई इकट्ठा करें।

Web Title : Thick Cream on Milk: Secret Tip for Rich Malai and Ghee

Web Summary : Achieve thick cream on milk with this simple trick: add rice while boiling on low heat. Cool, refrigerate uncovered, and collect the rich malai for homemade ghee.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.