Join us
Daily Top 2Weekly Top 5

दूध तापवताना घाला २ गोष्टी; येईल जाडजूड साय आणि ३ दिवसात मिळेल भरपूर दाणेदार- रवाळ तूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 14:12 IST

homemade ghee: thick milk cream: how to get thick malai on milk: दूध उकळताना दोन साध्या गोष्टी घातल्या तर आपल्याला रवाळ दाणेदार तूप मिळेल.

आपल्यापैकी अनेकांच्या घरी रोज दूध विकत आणलं जातं. घरच्याघरी उकळलेल्या दुधावर जाड, मलईदार साय यावी अशी अनेक गृहिणींची इच्छा असते. पण अनेकदा दूध उकळूनही त्यावर पातळ साय येते किंवा साय नीट जमतच नाही.(homemade ghee) घरच्या घरी तूप बनवण्यासाठी दुधापासून लोणी आणि तूप बनवण्यासाठी दुधावर घट्ट साय येणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आपण दूध उकळतो आणि लगेच फ्रिजमध्ये ठेवतो, पण तरीही साय पातळच येते. खरंतर, दुधावर जाडसर साय येण्यासाठी, दूध उकळण्याची पद्धत, भांडे, उष्णतेचे योग्य प्रमाण आणि दूध थंड करण्याची पद्धत या सगळ्या लहान - सहान गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.(thick milk cream)घरच्या घरी बनवलेलं तूप म्हणजे आरोग्य, चव आणि शुद्धतेची खात्री.(how to get thick malai on milk) पण अनेकदा दुधावर सायच येत नाही, साय पातळ राहते किंवा तूप करताना ते दाणेदार, रवाळ न होता चिकट होतं. बाजारात मिळणारं तूप महाग तर असतंच, शिवाय त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.(desi ghee at home) अशावेळी जर दुधावर जाड, पांढरी शुभ्र साय यावी आणि त्यापासून फक्त ३ दिवसांत किलोभर दाणेदार, सुगंधी तूप मिळालं, तर? यासाठी दूध उकळताना दोन साध्या गोष्टी घातल्या तर आपल्याला रवाळ दाणेदार तूप मिळेल. यासाठी काय करायला हवं पाहूया.

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स 

दुधावर जाडसर, दाट, घट्ट साय येण्यासाठी काय करावं?

दुधावर चपातीसारखी जाड आणि घट्ट साय येण्यासाठी आपल्याला फक्त दूध गरम करणे पुरेसे नसते. तर यासाठी काही खास ट्रिक्स वापरव्या लागतात. ज्यामुळे दुधावरही सायीचा जाड थर जमा होईल. 

दूध ओतण्यापूर्वी पातेले थंड पाण्याने विसळून घ्या. पातेले थोडे ओले झाल्यानंतर दूध तळाला चिकटत नाही आणि त्यातील फॅट्स जळण्याऐवजी सायीच्या रुपात वर येतात. 

दूध कधीही फास्ट गॅसवर उकळवून नका. मंद आचेवर ठेवल्यास ते हळूहळू गरम होते. ज्यामुळे जाड साय तयार होण्यास मदत होईल. दुधावर जाड साय येण्यासाठी त्यात थोडेसे कच्चे तांदूळ घाला. तांदूळ जास्त घेऊ नका. यामुळे दुधावर घट्ट जाड साय येते. 

दूध उकळल्यानंतर त्याला लगेच हलवू नका. त्यावर जाळी किंवा ताटाने झाकून ठेवा. ज्यामुळे साय तयार होते. गरम दूध फ्रीजमध्ये ठेवल्यास साय नीट जमत नाही. दूध उकळताना त्यात चिमूटभर साखर घातल्यास साय अधिक पांढरी शुभ्र आणि जाड येते. फ्रीजमध्ये दूध ठेवल्यास साय एकदम जाड, कोरडी आणि चपातीच्या पदरासारखी घट्ट जमेल. ही प्रक्रिया २-३ दिवस सुरू ठेवा. यातून शुद्ध तूप काढता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Thick Cream & Ghee: Two secrets for rich milk cream & ghee.

Web Summary : Get thick cream on milk easily! Add rice & sugar while boiling. Cool before refrigerating for best results and pure ghee.
टॅग्स :अन्नपाककृती