Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पुलाव किंवा भातात पाणी जास्त झालंय? ४ सिक्रेट ट्रिक, भात होईल मऊ-मोकळा आणि हॉटेलसारखा सुटसुटीत

पुलाव किंवा भातात पाणी जास्त झालंय? ४ सिक्रेट ट्रिक, भात होईल मऊ-मोकळा आणि हॉटेलसारखा सुटसुटीत

Rice cooking tips: Pulao rice tips: Fluffy rice cooking: बिघडलेला पुलाव किंवा भात काही मिनिटांत पुन्हा मोकळा करण्यासाठी सोप्या टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2026 18:08 IST2026-01-18T18:07:44+5:302026-01-18T18:08:44+5:30

Rice cooking tips: Pulao rice tips: Fluffy rice cooking: बिघडलेला पुलाव किंवा भात काही मिनिटांत पुन्हा मोकळा करण्यासाठी सोप्या टिप्स..

How to fix rice with too much water Tricks to make rice fluffy and non sticky Watery pulao fix at Home How to cook hotel style rice perfectly Rice cooking mistakes and solutions | पुलाव किंवा भातात पाणी जास्त झालंय? ४ सिक्रेट ट्रिक, भात होईल मऊ-मोकळा आणि हॉटेलसारखा सुटसुटीत

पुलाव किंवा भातात पाणी जास्त झालंय? ४ सिक्रेट ट्रिक, भात होईल मऊ-मोकळा आणि हॉटेलसारखा सुटसुटीत

अनेकदा असं होतं की आपण खूप प्रेमाने आणि मेहनतीने पुलाव किंवा बिर्याणी बनवतो. पण पाण्याचे प्रमाण थोडे जरी चुकले तरी सगळा भात चिकट किंवा गचका होतो. ज्यामुळे आपला पूर्ण बेत बिघडल्यासारखा वाटतो.(Rice cooking tips) मग तो गिचका भात खाण्याची कोणाला इच्छा होत नाही. भातात किंवा पुलावात पाणी जास्त झाले असेल, तर काही साध्या घरगुती ट्रिक्स वापरुन आपण पुन्हा त्याला हॉटेलसारखा सुटसुटीत आणि मोकळा करु शकतो. (Pulao rice tips)
भात शिजताना त्यात पाणी जास्त झाले असेल तर याचा अर्थ असा की त्यात ओलावा जास्त आहे.(Fluffy rice cooking) हा ओलावा काढून टाकण्यासाठी आपल्याला काही सोप्या ट्रिक्स वापरव्या लागतील. ज्यामुळे बिघडलेला पुलाव किंवा भात काही मिनिटांत पुन्हा मोकळा होण्यास मदत होईल. 

शुगर वाढण्याची भीती विसरा! स्वयंपाकघरातील चिमूटभर मसाला डायबिटीसवर रामबाण, 'या' पद्धतीने खा-साखर राहिल नियंत्रणात

1. जर भातात पाणी जास्त झाले असेल तर गॅस बंद करा. भाताच्या वर २ ते ३ ब्रेडचे स्लाईस ठेवा आणि वरुन झाकण लावून ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. ब्रेडमधील सच्छिद्र भाग भातातील अतिरिक्त वाफ आणि पाणी शोषून घेतो. त्यानंतर ब्रेड काढून घ्या, यामुळे आपला भात एकदम मोकळा होतो. 

2. आपल्याला वेळ असेल तर चिकट झालेला भात एका मोठ्या ताटात किंवा परातीत पातळ पसरवून ठेवा. हा भात १० ते १५ मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमधील थंड आणि कोरडी हवा भातातील ओलावा लवकर शोषून घेतो. यामुळे भाताचे दाणे एकमेकांपासून वेगळे होतात आणि चिकटपणा निघून जातो. 

3. भाताच्या पातेल्यावर झाकण ठेवण्यापूर्वी त्यावर एक जाड टिश्यू पेपर किंवा वर्तमानपत्राचा कागद ठेवा आणि मग वरुन झाकण लावा. कागद भाताची वाफ शोषून घेतो, ज्यामुळे पाणी भातात पडत नाही आणि भात कोरडा होण्यास मदत असते. 

4. जर पाणी खूप जास्त नसेल, पण भात थोडा चिकट वाटत असेल तर पातेल्याखाली जाड लोखंडी तवा ठेवा. गॅसची फ्लेम एकदम मंद करा आणि झाकण लावून ५ ते ७ मिनिटे दम द्या. तव्याच्या उष्णतेमुळे भाताच्या तळाला पाणी साचत नाही. वाफेच्या साह्याने अतिरिक्त ओलावा जाण्यास मदत होते. 

5. भात चिकट झाला असेल तर त्यात लगेच चमचा फिरवू नका. यामुळे दाणे तुटतात. शिजवतानाच पाण्यात १ चमचा लिंबाचा रस किंवा तेल टाकल्यास भात सुटसुटीत होतो. 

 

Web Title : गीला चावल ठीक करें: फूला हुआ, होटल-शैली चावल के लिए 4 गुप्त युक्तियाँ

Web Summary : चावल या पुलाव में बहुत अधिक पानी? अतिरिक्त नमी को अवशोषित करने के लिए ब्रेड, फ्रिज-ठंडा, पेपर टॉवल या कम गर्मी का उपयोग करें। गर्म, चिपचिपे चावल को हिलाने से बचें; सर्वोत्तम परिणामों के लिए पकाते समय नींबू या तेल डालें।

Web Title : Fix Mushy Rice: 4 Secret Tricks for Fluffy, Hotel-Style Rice

Web Summary : Too much water in rice or pulao? Use bread, fridge-chill, paper towel, or low heat to absorb excess moisture. Avoid stirring hot, sticky rice; add lemon or oil while cooking for best results.