Join us  

भाजी जास्त तिखट झाली किंवा तेल जास्त पडलं तर ४ ट्रिक्स वापरा; स्वयंपाक होईल स्वादिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 2:19 PM

How To fix extra spicy food : कधी कधी भाजी जास्त तिखट होते तर तेल जास्त असल्यानं खाविशी वाटतच नाही. मसाल्यांचे योग्य गुणोत्तर माहीत नसल्यामुळे पदार्थ बिघडतात.

जेवणातील तेल आणि मसाल्यांमुळे जेवणाची चव अधिक सुधारते. मसाल्यांशिवाय कोणताही पदार्थ चविष्ट लागत नाही. पण हेच मसाल आणि तेल जास्त झाले तर  जेवणाची चवही खराब करू शकतात. अनेक वेळा अन्न शिजवताना तेल, मसाले योग्य प्रमाणात मिसळले नाहीत तर त्याची चव बिघडते. रेसिपीमध्ये तेल मसाले कमी-जास्त असतील तर जेवणाला चविष्ट चव येऊ लागते. (Cooking Hacks) ही चूक अशा लोकांकडून होते.  जे क्वचितच स्वयंपाकघरात जातात त्यांचा दररोज स्वयंपाक न केल्यामुळे मसाल्यांच्या प्रमाणाचा अचूक अंदाज माहित नसतो. (Cooking tips to reduce spice in food easy kitchen hacks to fix extra spicy food)

कधी कधी भाजी जास्त तिखट होते तर तेल जास्त असल्यानं खाविशी वाटतच नाही. मसाल्यांचे योग्य गुणोत्तर माहीत नसल्यामुळे पदार्थ बिघडतात. तुम्ही काही सोप्या मार्गांनी जेवणाची चव सुधारू शकता. (Kitchen Hacks) जास्त तेलाने, मसाल्यांनी खराब झालेली चव पुन्हा दुरुस्त करता येते. या लेखात तुम्हाला काही ऑपशन्स सांगणार आहोत. ज्यांचा रोजच्या स्वयंपाकात वापर करून तुम्ही चविष्ट जेवण बनवू शकता. 

1) उकडलेले बटाटे

जर तुम्ही ग्रेव्हीची भाजी बनवत असाल आणि त्यात तेल जास्त पडलं असेल तर यामध्ये थोडे उकडलेले बटाटे घालून झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवा. बटाटे अतिरिक्त तेल शोषून घेतील आणि तेलाचे प्रमाण मसाल्यांच्या प्रमाणानुसार समान असेल. मसाले किंवा मीठ कमी असल्यास त्यात मसाल  घालून भाजी पुन्हा २ ते ५ मिनिटे शिजवावी.

2) टोमॅटो प्युरी

भाजीमध्ये तेल जास्त वाटत असेल तर प्रथम भाजीच्या वरच्या थरापासून तेल वेगळे करा. नंतर त्यात टोमॅटो प्युरी घाला. ही ट्रिक तेल कमी करेल आणि चव वाढवेल. सुक्या भाजीमध्ये तेल मसाला जास्त असल्यास भाजी कढईतून काढून, तेल नितरुन घ्या. आता कढईत उरलेल्या तेलात टोमॅटो प्युरी टाकून शिजवून घ्या. प्युरी शिजल्यावर वरून शिजलेली भाजी घालून दोन मिनिटे झाकून ठेवा आणि मंद आचेवर शिजवा.

3) बेसन

कोणत्याही प्रकारच्या कोरड्या भाजीमध्ये तेल जास्त असल्यास तेल कमी करून भाजीची चव वाढवण्यासाठी बेसन हलके भाजून वरून मिक्स करावे. भाजी बेसन पीठात नीट एकजीव होईपर्यंत थोडा वेळ शिजवा. त्यामुळे भाजी कुरकुरीत आणि चविष्ट होईल.

4) ब्रेड

तेल जास्त असल्यास सुक्या भाजलेल्या ब्रेडचा चुरा भाजीमध्ये घालता येतो. जेव्हा  भाजीत जास्त तेल असते तेव्हा ब्रेड ते शोषून घेते आणि चव समान ठेवते. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स