Lokmat Sakhi >Food > वजन वाढेल म्हणून दही- भात खाणं टाळता? बघा चव आणि पौष्टिकता वाढविणाऱ्या दहीभाताची रेसिपी.. 

वजन वाढेल म्हणून दही- भात खाणं टाळता? बघा चव आणि पौष्टिकता वाढविणाऱ्या दहीभाताची रेसिपी.. 

South Indian Style Curd Rice: आपला आवडीचा दही भात आणखी पौष्टिक व्हावा आणि त्याची चवही खुलून यावी यासाठी खास टिप्स...(how to enhance the taste of south indian style curd rice?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 09:25 IST2025-09-11T09:21:55+5:302025-09-11T09:25:01+5:30

South Indian Style Curd Rice: आपला आवडीचा दही भात आणखी पौष्टिक व्हावा आणि त्याची चवही खुलून यावी यासाठी खास टिप्स...(how to enhance the taste of south indian style curd rice?)

how to enhance the taste of south indian style curd rice, how to make south indian style dahi bhaat | वजन वाढेल म्हणून दही- भात खाणं टाळता? बघा चव आणि पौष्टिकता वाढविणाऱ्या दहीभाताची रेसिपी.. 

वजन वाढेल म्हणून दही- भात खाणं टाळता? बघा चव आणि पौष्टिकता वाढविणाऱ्या दहीभाताची रेसिपी.. 

Highlightsदही भात करण्याची आणि तो खाण्याची योग्य पद्धत एकदा माहिती करून घ्या..

दही भात हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. दक्षिण भारतात तर दही भात विशेष आवडीने खाल्ला जातो. आपल्याकडेही जेवण झाल्यानंतर काही जणांना थोडासा भात दह्यामध्ये कालवून खायला आवडतं. पण शेवटी तो भातच. तो खाल्ला तर वजन आणि शुगर दोन्ही वाढेल याची भीती अनेकांच्या मनात असतेच. ते बऱ्याच अंशी खरंही आहे. म्हणूनच दही भात सुद्धा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खायला हवा असं आहारतज्ज्ञ सांगतात. दही आणि भात असं एकत्र करून खात असाल तर त्यातून म्हणावे तेवढे पौष्टिक घटक मिळत नाहीत (how to enhance the taste of south indian style curd rice?). म्हणूनच दही भात करण्याची आणि तो खाण्याची योग्य पद्धत एकदा माहिती करून घ्या..(how to make south indian style dahi bhaat?)

 

दही भात करण्याची याेग्य पद्धत

दही भात करताना त्यात अनेक जण फक्त थोडंसं मीठ घालतात. बाकी त्यात काहीही नसतं. अशा पद्धतीचा दही भात जर तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ला तर वजन आणि शुगर दोन्हीही वाढू शकते.

फक्त २० रुपयांत चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! कच्चं दूध चेहऱ्याला 'असं' फक्त लावा

म्हणूनच त्या भातामध्ये प्रोटीन्स आणि फायबर दोन्हीही कसे वाढतील याकडे लक्ष द्यायला हवं.

त्यासाठी दही भातामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे, फुटाणे, खोबरे असे पदार्थ घाला. या पदार्थांमधून प्रोटीन्स मिळतील. 

 

दही भातामध्ये तुम्ही मटारचे दाणे, कोथिंबीर, किसलेलं गाजर, हलकी परतून घेतलेली कोबी, फुलकोबी अशा भाज्याही घालू शकता. यामुळे दही भातामधले फायबरचे प्रमाण वाढेल आणि तो पचायला सोपा होईल.

मेहेंदीमुळे केशरी, लालसर रंगलेले केस आवडत नाही? मेहेंदीमध्ये 'हा' पदार्थ मिसळा- केसांना नॅचरल रंग येईल

दही भात करताना त्याला वरून साजूक तुपाची फोडणी घाला. फोडणी करताना त्यात मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ताही घाला. यामुळे पचायला तर तो सोपा होतोच, शिवाय त्याची चवही आणखी खुलून येते. 

शिवाय पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस वापरला तर तो जास्त पौष्टिक होईल. 

 

Web Title: how to enhance the taste of south indian style curd rice, how to make south indian style dahi bhaat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.