Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य पद्धतीचं मँगो रस्सम, नेहमीच्या आमटी- वरणापेक्षा वेगळं- चविष्ट- घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 09:40 IST

South Indian Special Mango Rassam: दक्षिण भारतात केलं जातं तसं अतिशय चवदार मँगो रस्सम कसं करायचं ते पाहुया..(how to do mango rassam?)

महाराष्ट्रात भातासोबत आमटी किंवा वरण आपण नेहमीच खातो. वरण किंवा आमटीचे वेगवेगळे प्रकार आपण करत असतो. पण कधीतरी चवीमध्ये थोडाफार बदल पाहिजेच असतो. अशी इच्छा झाल्यास दक्षिणात्य पद्धतीचे मँगो रस्सम करून बघा. वरण किंवा आमटीला हा एक उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी अतिशय सोपी असून खूप चटपटीत आहे (mango rassam recipe). त्यामुळे लहान मुलांसकट घरातल्या मोठ्यांनाही मँगो रस्सम नक्कीच आवडेल.(South Indian Special Mango Rassam)

मँगो रस्सम करण्याची रेसिपी 

 

मँगो रस्सम करण्यासाठी सगळ्यात आधी एक मध्यम आकाराची अर्धवट पिकलेली कैरी घ्या. त्यालाच आपण शाक असेही म्हणतो. 

आता ही कैरी भरीत करण्यासाठी वांगं भाजतो त्याप्रमाणे गॅसवर भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर तिची सालं काढून टाका. 

यानंतर तिचे बारीक तुकडे करून मिक्सरमधून ती बारीक करून घ्या. नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कांदा, थोडासा आल्याचा तुकडा, मिरे असं सगळं घाला आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून हे पदार्थ बारीक करून घ्या.

 आता या मिश्रणात पाणी घालून ते वरणासारखे पातळ करून घ्या. त्यानंतर ते गॅसवर उकळायला ठेवा. यादरम्यान त्यामध्ये एक ते दोन चमचे चिंचेचा कोळ, थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ, लाल तिखट घाला. 

रस्समला चांगली उकळी आल्यानंतर त्याला वरतून जिरे, मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग यांची कडकडीत फोडणी घाला.

हा दाक्षिणात्य पद्धतीचा रस्सम तुम्ही भातासोबत किंवा पोळी सोबतही खाऊ शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : South Indian Mango Rasam Recipe: A Delicious Twist on Traditional Dishes

Web Summary : Try this easy South Indian mango rasam recipe for a flavorful change from your usual lentil soup. This tangy and spicy dish is a delightful alternative, loved by all ages. Ready in minutes, it's perfect with rice or roti.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आंबा