उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात ताजे कलिंगड दिसायला सुरूवात होते. प्रत्येक फळाचे हंगामाच्या हिशोबानं बरेच फायदे मिळतात. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी तसंच हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. कलिंगड खाल्ल्यानं फक्त हृदयाचे आरोग्य चांगले राहत नाही तर वजन कमी करणंही सोपं होतं. कलिंगड खाण्याचे बरेच फायदे आहेत. कलिंगड तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आहारात घेऊ शकता. मोठ्यापासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच कलिंगड खायला खूप आवडते. (How To Cut Watermelon For Kids)
लहानपणापासून आपण कलिंगड २ भागात चिरून मग खातो. पण इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका महिलेनं कलिंगड कसे खावे याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही आयडीया बऱ्याच लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
लहान मुलांसाठी कलिंगड चिरण्याची खास ट्रिक
कंटेट क्रिएटर वसंता वासू यांनी एक हॅक सांगितला आहे. ज्यात ते कलिंगड मधोमध कापण्याऐवजी वरच्या बाजूनं कापून वेगळे करत आहेत. पहिल्यांदा एका लाईनने कापलं जातं. नंतर थोडा गॅप ठेवून दुसरी लाईन कापली जाते. त्यानंतर मोठा तुकडा काढून आपल्या मुलांना खायला दिला जातो. मुलांचे एक्सप्रेशन्स सांगतात की त्यांना कलिंगड आवडले की नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक यावर रिएक्शन्स आणि इमोजी पाठवत आहेत. हा हॅक लोकांना पूर्णपणे आवडलेला नाही. कारण काहीजणांचे म्हणणे आहे की कलिंगड वरून कापल्यामुळे खराब होऊ शकतो.
या पद्धतीनं कलिंगड कापण्यास काही हरकत नाही पण यातील बिया तुम्हाला हातानं वेगळ्या कराव्या लागतील. वरून कापल्यावर आकार इतकासा व्यवस्थित दिसत नाही.कोणत्याही पद्धतीनं कलिंगड खाल्ले तरी तुम्हाला सारखेच फायदे मिळतील. यात व्हिटामीन्स पासून एंटी ऑक्सिडेंट्स असतात.
कंटेट क्रिएटर वसंता वासू यांनी इंस्टाग्रामवर ही रिल शेअर करत लहान मुलांसाठी कलिंगड या पद्धतीनं कापा. असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३७ हजार लोकांनी लाईक केले आहे तर पोस्टवर ५८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
Web Summary : A unique watermelon cutting hack for kids is trending online. Instead of cutting it in half, slice from the top. This method, shared by content creator Vasantha Vasu, is gaining popularity, although some worry about spoilage. It offers a fun and easy way to serve watermelon.
Web Summary : बच्चों के लिए एक अनोखा तरबूज काटने का तरीका ऑनलाइन ट्रेंड कर रहा है। इसे आधा काटने के बजाय, ऊपर से काटें। कंटेंट क्रिएटर वसंत वासु द्वारा साझा की गई यह विधि लोकप्रियता प्राप्त कर रही है, हालांकि कुछ लोगों को खराब होने की चिंता है। यह तरबूज परोसने का एक मजेदार और आसान तरीका प्रदान करता है।