How to boil potato without water : सामान्यपणे सगळ्याच घरांमध्ये बटाटे उकडण्यासाठी कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये भरपूर पाणी घालतात. मात्र पाणी जास्त झालं की बटाटे पाणचट होतात, फार मऊ पडतात आणि तुटायला लागतात. अशा बटाट्यांपासून पुरी, कटलेट किंवा वडा नीट तयार होत नाही. जर तुमच्याबरोबरही हे वारंवार होत असेल, तर ही माहिती नक्की उपयोगी ठरेल. आम्ही जर सांगितलं की, पाणी न घालताही आपण बटाटे उकडू शकता. त्यासाठी काही ट्रिक वापराव्या लागतील. बहुतांश लोकांना या ट्रिक्स माहिती नसतात. चला तर मग जाणून घेऊया हे सोपे आणि उपयुक्त उपाय.
पाणी न वापरता बटाटे उकडण्याचे सोपे उपाय
1) कुकरमध्ये पाणी न घालता बटाटे उकडण्याची पद्धत
सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर प्रत्येक बटाटा दोन तुकड्यांमध्ये कापा. हे तुकडे कुकरमध्ये ठेवा. आता त्यावर १ ते दीड चमचा मीठ शिंपडा. एक जाड कॉटनचा कपडा घ्या, तो पाण्यात भिजवून नीट पिळून घ्या आणि बटाट्यांवर पसरवा. कुकरचे झाकण लावून २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या. नंतर गॅस बंद करा. झाकण उघडल्यावर तुम्हाला दिसेल की बटाटे छान उकडलेले आहेत, तेही पाणी न घालता.
2) मायक्रोवेव्हमध्ये बटाटे उकडा
आधी तर बटाटे स्वच्छ धुवा आणि दोन भागांत कापा. काट्याने बटाट्यांवर थोडी छिद्र पाडा. आता हे बटाटे काचेच्या भांड्यात ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. साधारण ५ मिनिटांत बटाटे पूर्णपणे उकडतात. या पद्धतीत पाणी वापरण्याची अजिबात गरज नसते.
3) अॅल्युमिनियम फॉइलमध्ये बटाटे शिजवण्याची पद्धत
बटाटे धुवून त्यावर थोडंसं तेल लावा. प्रत्येक बटाटा अॅल्युमिनियम फॉइलमध्ये घट्ट गुंडाळा. आता हे बटाटे पाणी न घालता, मंद आचेवर झाकण लावून १५–२० मिनिटे शिजवा. फॉइलच्या आत साठलेली उष्णता बटाटे आतून पूर्णपणे शिजवते. हा उपाय अतिशय सोपा आणि प्रभावी आहे.
