Join us

डाळ लवकर शिजतच नाही? कुकरमध्ये डाळ शिजवताना ४ गोष्टी घाला; साध्या वरणाची वाढेल चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 17:46 IST

How To Cook Dal, Do's And Don'ts To Make It Perfectly : डाळ लवकर शिजत नसेल, प्रेशर कुकरमधून पाणी फसफसून बाहेर येत असेल तर..

भारतीय आहारात कडधान्य आणि डाळींचा (Dal Cooking Tips) वापर होतो. कडधान्य आणि डाळींमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. ज्याचा फायदा निश्चितच आरोग्याला होतो (Health Tips). अनेकांचं वरण - भाताशिवाय पोट भरत नाही. २ घास का असेना पोट भरण्यासाठी आपण वरण - भात खातोच. यामुळे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. लोक अनेकदा डाळी बनवण्यासाठी प्रेशर कुकरची मदत घेतात. किंवा साध्या भांड्यातही डाळी शिजत घालतात. पण अनेकदा डाळ लवकर शिजत नाही. तळाशी लागते आणि करपते. ज्यामुळे शिजलेल्या डाळीची टेस्टही बिघडते.

डाळ शिजण्याआधी नक्की कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? हे बहुतांश लोकांना ठाऊक नाही. जर गॅस आणि वेळेची बकॅह्त व्हावी असं वाटत असेल तर, काही टिप्स फॉलो करा. यामुळे नक्कीच डाळ परफेक्ट आणि कमी वेळात शिजेल(How To Cook Dal, Do's And Don'ts To Make It Perfectly).

डाळ लवकर शिजण्यासाठी नक्की कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात?

डाळ शिजत घालण्याआधी भिजत घाला

डाळ लवकर शिजत नसेल तर, ३० ते १ तास आधी पाण्यात भिजत घाला. यामुळे कडधान्य किंवा डाळी छान भिजतील. ज्यामुळे डाळ शिजण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. त्यामुळे डाळ शिजत घालण्यापूर्वी एका भांड्यात पाणी घ्या, त्यात ३० मिनिटे आधी डाळ भिजत घाला.

हिवाळ्यात फक्कड चहा हवाय? त्यात घालं '१' पदार्थ; आरोग्य राहील सुदृढ; सर्दी - खोकलाही राहील दूर

प्रेशर कुकरचा योग्य वापर

गॅस आणि वेळेची बचत व्हावी म्हणून लोक प्रेशर कुकरचा वापर करतात. प्रेशर कुकरमध्ये डाळ - तांदूळ शिजत ठेवल्याने लवकर शिजते. पण बऱ्याचदा प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी फसफसून बाहेर येते. यासाठी डाळ शिजत घालताना डाळीच्या पातळीपेक्षा १-२ इंच वर असावे. सुरुवातीला १-२ शिट्ट्या मोठ्या आचेवर शिजू द्या आणि नंतर मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवा.

चिमुटभर हिंग - हळद

हिंग आणि हळद डाळीची चव तर वाढवतातच, पण त्याच्याव्यतिरिक्त डाळ लवकर शिजण्यासही मदत होते. हा एक घरगुती उपाय आहे.

बेकिंग सोडा

जर डाळी लवकर शिजत नसेल तर, बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी डाळी शिजत घालताना त्यात चिमुटभर बेकिंग सोडा घाला. यामुळे डाळ लवकर शिजेल, पण याची किंचित चव बदलेल.

वाटीभर मेथी दाण्यांचे करा पौष्टीक लाडू, कडू अजिबात होणार नाही; हिवाळ्यात दुखण्यांपासून राहाल लांब

डाळ शिजत घातल्यावर कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात?

डाळ शिजत घातल्यानंतर चमच्याने अधुमधून ढवळत राहा. जर डाळ घट्ट झाली असेल तर, त्यात कोमट पाणी ओता. यामुळे डाळ घट्ट होणार नाही. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स