Join us

ड्रॅगन फ्रुट कसं कापायचं? शेफ कुणाल कपूरने सांगितलेली खास युक्ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 13:35 IST

Proper Method of Cutting Dragon Fruit: ड्रॅगन फ्रुट कापताना किंवा त्याचं साल काढताना बऱ्याच जणी हैराण होऊन जातात. म्हणूनच सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur) यांची ही खास युक्ती एकदा बघाच.

ठळक मुद्देड्रॅगन फ्रुट कसं कापायचं याविषयी कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ खरोखरच अनेक जणींना उपयुक्त ठरणारा आहे.

आतून लालसर किंवा पांढरं निघणारं ड्रॅगन फ्रुट अनेकांच्या आवडीचं. लाे कॅलरी फ्रुट म्हणून हे फळ ओळखलं जातं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे लोकही ड्रॅगन फ्रुट खाऊ शकतात. शिवाय पौष्टिकतेच्या बाबतीतही हे फळ उत्तम आहे. इतर फळांपेक्षा त्याचं स्वरुप आणि चव वेगळी असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ते आवडीने खातातही. पण हे फळ खाताना येणारी नेमकी अडचण म्हणजे ते कसं चिरावं (How to chop dragon fruit properly?) किंवा त्याचं साल कसं काढावं, हे अनेकांना कळतच नाही. म्हणूनच कुणाल कपूर यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ एकदा बघाच..

 

ड्रॅगन फ्रुट कापण्याची याेग्य पद्धत१. ड्रॅगन फ्रुट कसं कापायचं याविषयी कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ खरोखरच अनेक जणींना उपयुक्त ठरणारा आहे. खूप पसारा न होऊ देता झटपट ते कसं चिरायचं, याविषयी त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

अभिनेत्री जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, सुंदर त्वचेसाठी जुही सांगते एक सोपा घरगुती उपाय

२. सगळ्यात आधी तर ड्रॅगन फ्रुटचे मागचे आणि पुढचे देठ काढून घ्या. 

३. त्यानंतर ते फळ उभे करा आणि त्यावर एक उभा हलकासा छेद द्या.

४. बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूनेही एक हलकासा छेद द्या.

५. आता जिथून छेद दिला आहे तिथून त्याचे साल काढा. अलगदपणे सालं निघून गेल्यावर तुम्हाल पाहिजे त्या आकाराच्या फोडी करा.

 

ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे १. ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेसाठी ते पोषक ठरते.

डोळा सारखा फडफडतो? तब्येतीच्या ३ तक्रारी तर नाही, दुर्लक्ष करणं टाळाच..

२. या फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ते पचनासाठी चांगले असते.

३. लो कॅलरी फ्रुट म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांसाठीही उपयुक्त.

४. ॲण्टीऑक्सिडंट्स, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सही या फळामध्ये भरपूर असतात. 

 

टॅग्स :अन्नफळेकिचन टिप्सकुणाल कपूर