घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं मस्त पांढरीशुभ्र इडली खायला आवडते. आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला गरमागरम इडली खाण्याचा बेत केला जातो. परफेक्ट, मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करणे ही एक कलाच आहे. इडली जर मस्त फुगलेली, मऊ - लुसलुशीत आणि स्पॉंजी असेल तरच खायला मज्जा येते. इडली तयार करताना आपल्यापैकी बऱ्याचजणी अतिशय लहान - सहान चुका करतात, ज्यामुळे इडली फसते किंवा अनेकदा ती न फुगता दडदडीत होते. इडली तयार करताना आपण अनेकदा एक मोठी चूक करतो, ती म्हणजे इडली पात्रात पुरेसा वेळ होण्यापूर्वीच झाकण वारंवार उघडून पाहणे. असे केल्याने इडलीच्या आत जमा झालेली वाफ बाहेर निघून जाते, ज्यामुळे इडली व्यवस्थित फुगत नाही आणि ती व्यवस्थित वाफवली (Perfectly cooked idli signs) न जाता कच्चीच राहते. अशी कच्ची, व्यवस्थित न शिजलेली किंवा फुगलेली इडली खायला कुणालाच आवडत नाही. यासाठीच, इडली दरवेळी परफेक्ट आणि स्पॉन्जी, मऊसूत व्हावी, यासाठी ती शिजली आहे की नाही हे इडली पात्र न उघडताच ओळखणे गरजेचे असते(how to check if idli is cooked).
अनेकदा आपण इडली तयार करताना ती व्यवस्थित शिजली आहे का हे पाहण्यासाठी इडली पात्र वारंवार उघडतो, पण त्यामुळे आतली वाफ निघून जाते आणि इडली कोरडी किंवा कच्ची राहते. अशावेळी जर आपल्याला इडली पात्र न उघडताच इडली शिजली आहे का हे ओळखता आलं, तर इडली नेहमीच मऊ, लुसलुशीत आणि परफेक्ट सॉफ्ट करता येणे सहज शक्य होईल. अशा काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्यांच्या मदतीने आपण इडली पात्रातील इडली झाकण न उघडताच, फक्त सुगंध आणि आवाजावरून (How to know idli is ready to eat) इडली व्यवस्थित शिजली आहे की नाही, हे ओळखू शकतो.
इडली पात्राचे झाकण न उघडताच, इडली शिजली आहे की नाही ते असे ओळखा...
१. इडली नेहमी निश्चित वेळेनुसार किंवा घड्याळात अचूक वेळ लावून मगच शिजवावी. इडली पात्रात वाफ तयार झाल्यावर मोठ्या किंवा मध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटे वाफवल्यास इडली व्यवस्थित फुगून मऊ - लुसलुशीत होते. साधारणपणे मध्यम आचेवर इडली शिजायला १० ते १२ मिनिटं लागतात. त्यामुळे टायमर लावल्यास इडली पात्र वारंवार उघडण्याची गरज भासत नाही. ही १२ ते १५ मिनिटे पूर्ण झाल्यावर, झाकण उघडण्यापूर्वी गॅस बंद करा आणि इडलीला ५ मिनिटे त्याच वाफेमध्ये इडली पात्रात तसेच ठेवून द्या यामुळे इडली अधिक मऊ होते.
पंतप्रधान मोदींना आवडते ओडिशाची खास कॉफी! पाहा कोरापुट कॉफी म्हणजे काय, खासियत काय...
२. इडली शिजायला लागल्यावर सुरुवातीला वाफेचा आणि पिठाचा वास येतो. जेव्हा इडली पूर्णपणे शिजते, तेव्हा एक गोड, आंबटसर आणि भाजलेला असा वास स्वयंपाकघरात पसरतो. असा वास येणे म्हणजे इडली व्यवस्थित वाफवली गेली आहे असे समजावे.
३. सुरुवातीला इडली पात्रातून जोरात आणि खूप मोठ्या प्रमाणावर वाफ बाहेर पडते. जेव्हा इडली पूर्णपणे शिजते, तेव्हा वाफेचा जोर आणि प्रमाण आपोआप कमी होते. वाफेचा जोर कमी होणे, म्हणजे इडलीने वाफ शोषून घेतली आहे आणि ती खाण्यासाठी तयार आहे असे समजावे.
रेस्टॉरंटस्टाईल पनीरची ग्रेव्ही करण्याच्या ५ टिप्स! रंग, चव, सुगंध एकदम परफेक्ट - खा मनसोक्त...
४. इडली शिजत असताना पात्रातून सतत शिजण्याचा किंवा बुडबुड्यांचा आवाज येत असतो. इडली पूर्ण शिजल्यावर, पात्रातून येणारा हा आवाज हळूहळू शांत होतो किंवा पूर्णपणे थांबतो. हा आवाज कमी होणे म्हणजे इडली तयार आहे.
५. जर पात्राचे झाकण काचेचे असेल, तर इडली शिजल्यावर झाकणाच्या आतील बाजूला जास्त प्रमाणात पाणी जमा झालेले दिसेल. हे पाणी इडली पूर्ण शिजल्यावर गोळा होते यावरून असे समजावे की इडली पूर्णपणे शिजून खाण्यासाठी तयार आहे.
उडप्याकडे मिळतो तसा परफेक्ट गोल मेदू वडा होईल! आजच विकत आणा 'हा' चमचा - गोल, गरगरीत वडा झक्कास...
६. हलक्या हाताने पात्रावर टॅप केल्यावर जर आवाज मोकळा आणि हलका वाटला, तर इडली पूर्ण शिजलेली असते.
७. इडली पात्रात इडली वाफवायला ठेवल्यावर, पात्राचे झाकण लावल्यावर झाकणाच्या कडेने निघणारी हलकीशी वाफ ही नेहमी वरच्या दिशेने जाते. याउलट जेव्हा इडली पूर्णपणे वाफवून तयार होते तेव्हा आपोआप वाफ झाकणातून बाहेर येऊन खालच्या दिशेने जाऊन मग पुन्हा वर येताना दिसते. जेव्हा वाफ अशी खालच्या दिशेने जाऊन पुन्हा वर येईल तेव्हा पात्रातील इडली पूर्णपणे व्यवस्थित वाफवली गेली आहे असे समजावे.
