Lokmat Sakhi >Food > बाजारातून विकत आणलेल्या लाल तिखटात भेसळ आहे की नाही कसं ओळखाल? FSSAI नं सांगितली खास ट्रिक!

बाजारातून विकत आणलेल्या लाल तिखटात भेसळ आहे की नाही कसं ओळखाल? FSSAI नं सांगितली खास ट्रिक!

Adulteration Test: लाल मिरची पावडरमध्ये भेसळ आहे की नाही हे कसं ओळखावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचंच उत्तर FSSAI नं दिलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:42 IST2025-04-08T12:00:18+5:302025-04-08T17:42:58+5:30

Adulteration Test: लाल मिरची पावडरमध्ये भेसळ आहे की नाही हे कसं ओळखावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचंच उत्तर FSSAI नं दिलं आहे.

How to check adulteration in red chilly powder | बाजारातून विकत आणलेल्या लाल तिखटात भेसळ आहे की नाही कसं ओळखाल? FSSAI नं सांगितली खास ट्रिक!

बाजारातून विकत आणलेल्या लाल तिखटात भेसळ आहे की नाही कसं ओळखाल? FSSAI नं सांगितली खास ट्रिक!

Adulteration Test: लाल मिरची पावडरचा वापर भाजीला तिखट चव देण्यासाठी केला जातो. वेगवेगळे पदार्थ आणि भाज्यांमध्ये तिखटाचा वापर केला जातो. काही लोक लाल मिरच्या विकत आणून त्याचं तिखट बनवतात. तर जास्तीत जास्त लोक बाजारात मिळणारं पॅकेटमधील मिरची पावडर वापरतात. तर काही लोक खुलं मिरची पावडर वापरतात. पण आजकाल बाजारात भेसळयुक्त मिरची पावडर मोठ्या प्रमाणात मिळत. ज्यामुळे भाजी-पदार्थांची टेस्ट तर बिघडेतंच, सोबतच आरोग्यही बिघडतं. खुल्या मिरची पावडरमध्ये लाल वीटांचं पावडर मिक्स केलं जातं. अशात लाल मिरची पावडरमध्ये भेसळ आहे की नाही हे कसं ओळखावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचंच उत्तर FSSAI नं दिलं आहे.

लाल मिरची पावडरमधील भेसळ कशी ओळखाल?

FSSAI नुसार लाल मिरची पावडरमध्ये वॉटर सोल्यूबल कलर आणि आर्टिफिशिअल कलरची भेसळ असू शकते. हे ओळखण्यासाठी एक सोपी टेस्ट करू शकता. 1 ग्लास पाणी घ्या. त्यावर एक चमचा लाल मिरची पावडर टाका. ओरिजनल लाल मिरची पावडर पाण्यावर काही वेळ थांबेल आणि नंतर हळूहळू तळाला जाईल. 

तेच जर लाल मिरची पावडर ओरिजनल नसेल तर ते पाण्यावर जराही तरंगणार नाही आणि थेट ग्लासच्या तळाला जाईल व तसेच पावडरच्या रेषाही तयार होतील. अशाप्रकारची टेस्ट करून लाल मिरची पावडरची टेस्ट करू शकता. 

आणखी एक टेस्ट

- या ग्लासच्या टेस्टनंच समजून येईल की, लाल मिरची पावडरमध्ये भेसळ आहे की नाही. लाल मिरची पावडर पाण्यावर तरंगेल तर त्यात भेसळ नाही आणि जर पाण्यात लगेच मिक्स झालं आणि तळाला गेलं तर त्यात भेसळ आहे असं समजा.

- जर लाल मिरची पावडरमध्ये स्टार्चची भेसळ असल्याचं जाणून घ्यायचं असेल तर त्यात आयोडिनचे काही थेंब टाका. आयोडिन टाकल्यावर लाल मिरची पावडर निळ्या रंगाचं होईल, म्हणजे त्यात भेसळ आहे असं समजा.

Web Title: How to check adulteration in red chilly powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.