Join us

फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्याच्या या ४ पद्धती... भाज्या राहतील अधिककाळ फ्रेश आणि टवटवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 12:28 IST

Proper method for vegetable storage: बऱ्याचजणी आठवड्याच्या भाज्या एकदाच खरेदी करतात, पण मग त्या व्यवस्थित फ्रिजमध्ये न ठेवल्यामुळे खराब होऊन जातात... असं होऊ नये म्हणून ही काळजी घ्या....

ठळक मुद्देभाज्या खराब होऊ नयेत, त्या अधिक काळ फ्रेश आणि टवटवीत रहाव्यात यासाठी या काही पद्धती करून बघा.. 

रोज भाजी मार्केटमध्ये जाऊन फ्रेश भाजी (how to keep vegetables fresh in Marathi) आणणं बऱ्याच जणींना जमत नाही. किंवा आपल्या वेळेला भाजीवाला येईलच असंही नाही. त्यामुळे सहसा ४ ते ५ दिवस पुरेल एवढी भाजी आपण एकदम घेऊन ठेवतो. पण ही भाजी फ्रिजमध्ये ठेवताना नीट काळजी न घेतल्यामुळे भाज्या खराब होतात आणि ज्या उद्देशाने भाज्या आणल्या तेच नेमकं बिघडून जातं. म्हणूनच भाज्या खराब होऊ नयेत, त्या अधिक काळ फ्रेश आणि टवटवीत रहाव्यात यासाठी या काही पद्धती करून बघा.. 

 

१. भाज्या धुवून घेऊ नका...अनेक जणी भाज्या धुवून घेतात आणि नंतर त्या फ्रिजमध्ये ठेवतात. पण असं केल्यामुळे भाज्यांमध्ये थोडाफार का होईना पण ओलसरपणा राहतोच. भाज्या तुम्ही धुतल्यानंतर पुसून घेतल्या तरी त्या नीट कोरड्या होत नाहीत. त्यामुळे भाज्या धुवू नका. फक्त एका कोरड्या फडक्याने पुसा आणि मग फ्रिजमध्ये ठेवा.

 

२. पालेभाज्यांची ही काळजी घ्या.पालेभाज्या निवडल्या की लगेच त्या कागदात गुंडाळून किंवा डब्यात टाकून फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. असं करू नका. यामुळेच पालेभाज्या लवकर खराब होतात. पालेभाज्या निवडल्या की त्या पेपरवर थोड्या पसरवून टाका. अर्धा एक तास त्या जरा कोरड्या होऊ द्या आणि त्यानंतर त्या फ्रिजमध्ये ठेवा. 

 

३.  टिशू पेपर वापराहवाबंद डब्यामध्ये बाहेरून अजिबात हवा जात नाही. त्यामुळे भाज्या अधिक काळ चांगल्या राहतात. पक्कं झाकण असलेल्या स्टीलच्या डब्यातही पालेभाज्या २ ते ४ दिवस चांगल्या राहतात. यासाठी फक्त स्टीलच्या डब्यात खाली टिशू पेपर टाका. त्यानंतर त्याच्यावर भाजी ठेवा. वरून पुन्हा एक टिशू पेपर टाका. भाज्या नक्कीच फ्रेश राहतील. 

 

४. भाज्या ठेवण्याचे पाऊचआजकाल बाजाराच भाज्या ठेवण्यासाठी खास पाऊच मिळते. या पाऊचला वरून एक झिप असते. ही झीप लावली की ते पाऊच एकदम एअर टाईट होते. त्यामुळे मग त्यात भाज्या अधिक काळासाठी चांगल्या टिकून राहतात.   

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहोम रेमेडी