Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात किती चमचे तेल खायला हवं? डॉक्टर सरीन सांगतात योग्य प्रमाण, यापेक्षा जास्त खाल तर पडाल आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:42 IST

How Much Oil Safe Per Day : रोज वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. कधी खूप जास्त केला जातो. त्यामुळे आरोग्यासंबंधी गंभीर समस्या होतात. अशात रोज आपण किती तेल खायला हवं हे डॉक्टर सरीन यांनी सांगितलंय.

How Much Oil Safe Per Day : खाण्या-पिण्याच्या जास्तीत जास्त गोष्टींमध्ये तेल टाकलं जातं. भाजी, डाळ, पराठे, स्नॅक्स आणि फास्ट फूडसारख्या गोष्टींमध्ये बरंच तेलं वापरलं जातं. तेलातून शरीराला फॅट मिळतं, ते आवश्यकही असतं. पण जास्त प्रमाणात तेल खाल्लं तर गंभीर आजारही होऊ शकतात. तेल जर जास्त खात असाल तर लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, फॅटी लिव्हर आणि हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात निरोगी राहण्यासाठी आपल्याला माहीत असायला हवं की, रोज किती तेल खावं आणि किती खाल्लं तर आरोग्य बिघडू शकतं.

किती चमचे तेल खावं?

फूड सेफ्टी अॅन्ड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने ३० मार्च २०२६ रोजी आपल्या एक्स हँडलवर प्रसिद्ध लिव्हर डॉक्टर शिवकुमार सरीन यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात त्यांनी एका सामान्य वयस्क व्यक्तीने रोज जवळपास ५ ते ६ चमचे तेल किंवा तूप खाल्लं पाहिजे. एका चमच्यात साधारण ५ ग्रॅम तेल किंवा तूप येतं. यानुसार एका दिवसात २५ ते ३० ग्रॅम तेल किंवा तूप खाल्लं पाहिजे. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना काही आजार आहे त्यांनी तेल-तूप कमी खावं.

नॅचरल तेलावर लक्ष द्या

डॉक्टर पुढे सांगतात की, पराठ्यांवर जास्त तूप किंवा तेल लावू नये. असं केल्यास त्यातील तेलाचं प्रमाण वाढतं. खाण्या-पिण्याच्या बऱ्याच गोष्टींमध्ये नॅचरल ऑइल असतं. शेंगदाणे, बदाम, अक्रोड यातही तेल असतं. या गोष्टी खाल्ल्या तर शरीराला तेल मिळणार. या गोष्टीतील तेलामध्ये ओमेगा ३ असतं. जे आरोग्यासाठी चांगलं असतं. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यात आधीच तेल असतं. त्यामुळे तेल कमी प्रमाणातच खाल्लं पाहिजे. 

खाण्यातील तेल कसं कमी कराल?

हेल्थ एक्सपर्टनुसार, ज्यांना डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर किंवा हृदयरोगाची समस्या आहे, त्यांनी तेलाच्या प्रमाणाची खास काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तेलाचं प्रमाण ठरवावं. तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर रोज तेल वापरताना मोजूनच घ्या. डीप फ्रायऐवजी स्टीम, उकडणे किंवा ग्रिल अशा गोष्टी करू शकता. नॉन-स्टिक भांड्यांचा वापर करूनही तेलाचा वापर कमी करता येतो. त्याशिवाय बाहेरचे तळलेले-भाजलेले आणि प्रोसेस्ड फूड कमी खावेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Daily Oil Intake: How Much is Safe? Doctor Explains

Web Summary : Experts recommend 5-6 teaspoons of oil/ghee daily for healthy adults. Excess can cause obesity, high cholesterol, and heart issues. Focus on natural oils from nuts. Reduce oil by steaming, grilling, and using non-stick cookware.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स