उन्हाळा येताच रेफ्रिजरेटरची गरज आणि वापर दोन्हीही वाढत जातात. हे एक असं विद्युत उपकरण आहे जे दिवसरात्र सतत सुरू असतं. पण बऱ्याचदा लोकांच्या मनात रेफ्रिजरेटर नेहमी चालू ठेवणं योग्य आहे का? तो नेमका कधी बंद करावा? असे प्रश्न येत असतात. याचच उत्तर जाणून घेऊया...
तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा रेफ्रिजरेटर बंद करणं आवश्यक नाही. उलट वारंवार स्विच चालू आणि बंद केल्याने त्याच्या कंप्रेसर आणि कूलिंग सिस्टमवर अधिक दबाव येतो. यामुळे फ्रीज लवकर खराब होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर ही सवय ताबडतोब बदला.
आजकाल, सर्व मॉर्डन रेफ्रिजरेटरमध्ये ऑटोमॅटिक कट-ऑन फीचर असतं, जे गरजेनुसार रेफ्रिजरेटर चालू आणि बंद करतं. यामुळे विजेची बचत होते आणि रेफ्रिजरेटरची कार्यक्षमताही अबाधित राहते. याचा अर्थ असा की, तुम्हाला आता रेफ्रिजरेटर वारंवार चालू आणि बंद करण्याची गरज नाही.
तुमचा रेफ्रिजरेटर बंद करण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही तो स्वच्छ करत असता किंवा बराच वेळ घराबाहेर जाणार असता. तसेच रेफ्रिजरेटरमध्ये काही तांत्रिक समस्या असल्यास तो बंद करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
वीज वाचवण्यासाठी बरेच लोक दररोज काही तासांसाठी रेफ्रिजरेटर बंद करतात. पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे फक्त रेफ्रिजरेटर कार्यक्षमतेवरच परिणाम होत नाही तर आत साठवलेलं अन्न देखील खराब होऊ शकतं. यामुळे दुर्गंधी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो.
रेफ्रिजरेटर २४ तास चालू ठेवणं पूर्णपणे नॉर्मल आहे आणि ते आवश्यक देखील आहे, काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही मॉर्डन रेफ्रिजरेटर योग्यरित्या वापरला तर तो कोणत्याही समस्येशिवाय वर्षानुवर्षे चालेल. फक्त वेळोवेळी तो नीट स्वच्छ करा.