Join us  

पनीर पॉपकॉर्न खाल्लेत? आज थर्टीफस्टसाठी करा हा खास  क्रिस्पी, क्रंची स्टार्टर, रेसिपी सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 10:26 AM

Food and recipe: थर्टीफस्ट पार्टीसाठी काहीतरी हटके आणि स्पेशल स्टार्टर करायचंय? मग हा व्हिडियो लगेच बघा आणि बनवा हे मस्त चटपटीत क्रंची पनीर पॉपकाॅर्न..(crispy crunchy paneer popcorn)

ठळक मुद्देअसा जबरदस्त पदार्थ होईल की अगदी स्टार्टर खाकेही पार्टीका माहोल बन जायेगा..

थर्टीफस्टसाठी घरी पाहुणे येणार म्हटल्यावर त्यांच्या जेवणाचा मेन्यूही उत्तमच झाला पाहिजे... कारण पार्टी म्हणजे मस्त बघताक्षणीच खावा वाटणारा चटपटीत, चमचमीत मेन्यू असणार, असंच सगळ्यांनी गृहित धरलेलं असतं. पार्टीसाठी (delicious starter menu) तुमचा मेन कोर्स मेन्यू ठरला असेल आणि स्टार्टर काय करावं असा प्रश्न पडला असेल, तर हा पनीर पॉपकॉर्नचा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे... पनीर चिली, मन्चुरियन, व्हेज कबाब, चीज बॉल हे पदार्थ नेहमीच होतात. म्हणूनच तर तुमच्या पाहुण्यांना यावेळी पनीर पॉपकॉर्न खाऊ घाला.. असा जबरदस्त पदार्थ होईल की अगदी स्टार्टर खाकेही पार्टीका माहोल बन जायेगा.. ही रेसिपी (paneer popcorn recipe in Marathi) इन्स्टाग्रामच्या AartiMadan या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

image credit- google

पनीर पाॅपकॉर्न करण्यासाठी लागणारं साहित्य..Ingredients for making paneer popcorn४ टेबलस्पून कॉर्न फ्लॉअर, ४ टेबलस्पून मैदा, २ टेबल स्पून तांदळाचं पीठ, अर्धा टीस्पून ओरिगॅनो, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टिस्पून लसूण पेस्ट, दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, अर्धा टी स्पून काश्मिरी लाल तिखट, पाणी, तेल, चवीनुसार मीठ, २०० ग्रॅम पनीर, १ कप कॉर्न फ्लेक्स, १ कप ब्रेड क्रम्स.

 

कसे करायचे पनीर पॉपकॉर्नHow to make paneer popcorn- सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, तांदळाचं पीठ, ओरिगॅनो, कांदा, लसूण, तिखट, मीठ हे सगळं साहित्य टाका. त्यात पाणी टाका आणि भजे करण्यासाठी जसं सैलसर पीठ भिजवतो, तसं पीठ  भिजवून घ्या.- या पीठात आता पनीरचे छोटे छोटे, एकसारखे चौकोनी तुकडे कापून टाका. त्यांना पिठाचं व्यवस्थित कोटींग करा आणि १५ मिनिटे हे मिश्रण असंच राहून सेट होऊ द्या.- यानंतर एका बाऊलमध्ये कॉर्न फ्लेक्स क्रश करून टाका. त्यातच ब्रेड क्रम्स टाका. यामध्ये आता पिठात भिजवलेलं पनीर टाका. या मिश्रणाचं पनीरला व्यवस्थित कोटींग होईल, याची काळजी घ्या. सगळ्या पनीरला कोटींग झालं की पनीरचे सगळेच तुकडे एका प्लेटमध्ये ठेवा आणि १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून रेफ्रिजरेट करा.

- आता १५ मिनिटांनी एका कढईत तेल तापत ठेवा आणि त्या तेलात हे पनीर बॉल्स टाकून डिप फ्राय करून घ्या.- तळलेले गरमागरम पनीर पॉपकॉर्न एका बाऊलमध्ये टाका. ते असे नुसते खाल्ले तरी चालतात. पण हा एक सोपा उपाय करून त्याची चव आणखीन वाढविण्याचा प्रयत्न करा.- त्यासाठी एका बाऊलमध्ये चाट मसाला, गार्लिक पावडर, ऑनिअन पावडर, लाल तिखट हे सगळं प्रत्येकी अर्धा- अर्धा चमचा घ्या. ते व्यवस्थित मिक्स करा आणि आपण केलेल्या पनीर पॉपकॉर्नवर टाका. त्यानंतर सॉससोबत किंवा नुसतेही तुम्ही हे पनीर बॉल खाऊ शकता.- पाहुणे आले की मस्तपैकी टुथपीक लावून त्यांना ही गरमागरम डीश सर्व्ह करा..

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सबाय-बाय २०२१