Join us

How to make cake in cooker: ओव्हन नाही, कुकर तर आहे? करा कुकरमध्ये केक, सॉफ्ट-स्पॉंजी-सोपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 17:18 IST

Cake recipe: ख्रिसमसच्या निमित्ताने घरीच केक (Christmas special cake recipe) करायचा विचार करताय? पण घरी ओव्हन नाही.... नसे ना का, नाही तर नाही... कुकरमध्येही (soft spongy cake in cooker) मस्त स्पाँजी केक करता येताे.. बघा ही रेसिपी..

ठळक मुद्देकुकरमध्येही ओव्हन एवढाच छान स्पाँजी आणि सॉफ्ट केक बनवता येतो.कुकरमध्ये कसा केक करायचा, याचं हे अचूक तंत्र

लॉकडाऊनमध्ये जवळपास आपल्या सगळ्याच मैत्रिणींनी केक करण्याचे प्रयोग करून पाहिले. कुणाचे बेत फसले तर कुणाचे केक छान जमून आले.. कुणी आपल्याकडे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन (simple cake recipe without microwave and oven) नाही म्हणून केक करण्याच्या भानगडीतच पडले नाही. तर कुणी कुकरमध्येही उत्तम केक केले. कुकरमध्ये केक करताना किती वेळ आणि कसं बेक करायचं, याचं गणित अनेक जणींना जमलं नाही. त्यामुळे कधी केक फुगलाच नाही, तर कधी तो कच्चाच राहून गेला. तुमचंही असंच काहीसं झालं असेल, तर कुकरमध्ये कसा केक (eggless cake in cooker) करायचा, याचं हे अचूक तंत्र एकदा जाणून घ्या. कारण कुकरमध्येही ओव्हन एवढाच छान स्पाँजी आणि सॉफ्ट केक (homemade cake) बनवता येतो.

 

केक बनविण्यासाठी लागणारं साहित्यingredients for making cakeसव्वा कप मैदा, एक कप पिठी साखर, दिड टी स्पून बेकींग पावडर, अर्धा टी स्पून बेकींग सोडा, पाऊण कप कंडेन्स्ड मिल्क, ४ टेबल स्पून वितळलेलं तूप, १ टी स्पून व्हॅनिला इसेंस. (basic homemade cake recipe)

करा केक न करता बेक! 'नो बेक केक;ची भन्नाट रेसिपी, करा आणि मिळवा तारीफ

कसा करायचा केक?How to make cake in cooker?- सगळ्यात आधी तर आपल्याला ज्या कुकरमध्ये केक तयार करायचा आहे, त्या कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि आतली वायर काढून टाका.- यानंतर कुकरमध्ये एक मध्यम आकाराची वाटी भरून मीठ टाका. त्यावर आपण गरम भांडी किंवा कढई ठेवण्यासाठी जे स्टॅण्ड वापरतो ते स्टॅण्ड ठेवा.- आता मध्यम आचेवर गॅस लावा आणि त्यावर हे कुकर झाकण लावून ठेऊन द्या. १० मिनिटे कुकर याच अवस्थेत ठेवा. यालाच आपण प्री हीट (pre heat cooker for making cake) करणे असे म्हणतो.- आता केक बनविण्यासाठीचं सगळं साहित्य एका खोलगट बाऊलमध्ये एकत्र करून घ्या.

- मैदा, पिठीसाखर, बेकींग पावडर, बेकींग सोडा हे सगळं साहित्य चाळणीने चाळूनच घ्यावे.- आता कंडेन्स मिल्कचे प्रमाण कमी वाटले तर दूध टाका आणि सगळे मिश्रण छान फेटून घ्या.- पीठात गोळे राहणार नाहीत, याची काळजी घ्या.- ज्या भांड्यात केक लावणार आहात त्या भांड्याला तुपाचा हात फिरवा. त्यात थोडा मैदा टाका आणि तो डबा हलवून घ्या. जेणेकरून पिठाचा पातळसा थर सगळ्या भांड्याला लागेल. यालाच ग्रिसिंग करणं असं म्हणतात.

video credit- Youtube videos

- आता आपण केकचं मिश्रण या भांड्यात टाका. भांडे दोन- तीन वेळा थोडे वर धरून पुन्हा आपटा. यामुळे मग मिश्रणात काही एअर बबल असल्यास निघून जातात.- आता हे भांडे प्री हिटसाठी ठेवलेल्या कुकरमध्ये अलगद ठेवा.- कुकरचे झाकण लावा. २५ मिनिटे मध्यम ते मोठा या स्वरूपाचा गॅस ठेवा.- त्यानंतर पुढची १० मिनिटे कमी ते मध्यम या स्वरूपाचा गॅस असू द्या.

- यानंतर एखादी टुथपिक किंवा चाकू केकच्या मधोमध घालून बघा.- जर चाकूला किंवा टुथपिकला चिकट पीठ लागले नाही, तर आपला केक झाला असे समजावे. - गॅस बंद करा. केकचे भांडे बाहेर काढा. केक थोडा थंड झाला की आजूबाजूने चाकू टाकून त्याचे काठ मोकळे करून घ्या.- नंतर भांडे उपडे करा आणि अलगद केक बाहेर काढून घ्या. 

image credit- indianhealthyrecipes.com

 

टॅग्स :अन्नपाककृतीनाताळबाय-बाय २०२१कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.