'दही' हा भारतीय आहाराचा एक मुख्य, अविभाज्य भागच आहे. अनेक घरांमध्ये दही एकतर घरच्याघरीच लावले जाते किंवा बाजारातून विकत आणले जाते. दही खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. दही खाणे फायदेशीर असल्याने बहुतेक आपल्या सगळ्यांच्याच फ्रिजमध्ये कायम दही स्टोअर करून ठेवले जाते. परंतु दही स्टोअर करून ठेवताना अनेकदा मनात प्रश्न येतोच की, दही तयार केल्यावर ते किती दिवस स्टोर करून ठेवणे चांगले? किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले दही किती दिवस ताजे आणि खाण्यायोग्य राहते?(how long does dahi stay fresh health & storage tips).
चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त दिवस ठेवलेले दही आंबट होते, त्याची चव, रंग, पौष्टिकता आणि गुणधर्म बदलतात आणि शरीरावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठीच, दही तयार केल्यानंतर किंवा विकत आणल्यानंतर ते किती दिवस योग्यरित्या स्टोअर करावे हे जाणून घेणे गरजेचे असते. घरच्याघरीच तयार केलेलं किंवा विकत आणलेलं दही नेमके किती दिवस (how long does dahi stay fresh) स्टोअर करून ठेवणे योग्य मानले जाते ते पाहूयात.
दही नेमकं किती दिवस स्टोअर करून ठेवणं योग्य ?
दही हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, ज्यात गुड बॅक्टेरिया फारमोठ्या प्रमाणांवर असतात. हे जीवाणू शरीराची पचनक्रिया चांगली ठेवतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.पण, दही जसजसे जुने होत जाते, तसतसे या जीवाणूंची गुणवत्ता आणि सक्रियता कमी होऊ शकते. यामुळेच दही जास्त दिवस साठवून ठेवणे योग्य मानले जात नाही. साधारणपणे घरी लावलेलं ताज दही फ्रीजमध्ये फक्त २ ते ३ दिवसांपर्यंतच ठेवता येते. जर हवामान गरम असेल, तर हा कालावधी आणखी कमी होऊ शकतो, कारण उन्हाळ्यात दही लवकर आंबट होऊ लागते.
विदर्भ स्पेशल! तुरीच्या दाण्यांचा ‘सोले भात'! अस्सल पारंपरिक वैदर्भिय चव, हिवाळ्यातला खास बेत...
याचबरोबर, बाजारांतून पॅकेजिंगमधील विकत आणलेलं दही, पॅकिंग आणि प्रोसेसिंगमुळे त्याची शेल्फ लाईफ थोडी जास्त असते. पॅक केलेले दही साधारणपणे ७ ते १० दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये खराब न होता चांगले टिकून राहते. पण, ते दही पॅकेटवर लिहिलेल्या "एक्सपायरी डेट" च्या आतच वापरले पाहिजे. एकदा पॅकेट उघडले की, २ ते ३ दिवसांच्या आत संपवण्याचा प्रयत्न करा. कारण, पॅकेटला वारंवार हवा लागल्याने आणि त्यात चमचा घातल्याने बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक जास्त असतो.
काही लोक असे मानतात की, दही आंबट झाले, तरी त्याचा उपयोग आणखी काही दिवस करता येऊ शकतो. आंबट दही पचनास जड असू शकते आणि अनेकदा ॲसिडिटी किंवा गॅस सारख्या समस्या देखील निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत आंबट दही खाणे टाळणे चांगले आहे. आंबट दह्याचा वापर कढी, इडली, डोसा बॅटर किंवा मॅरिनेशन यांसारख्या गोष्टींमध्ये केला जाऊ शकतो, पण ते नुसते खाण्यासाठी ते योग्य नसते.
जावित्रीचा चहा तुम्हाला थंडीतही ठेवतो सुपरफिट! चहा ‘असा’ करा आणि हिवाळ्यात लांब ठेवा सगळेच आजार...
दही स्टोर करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स...
१. दही नेहमी एअर टाईट कंटेनरमध्येच स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवा.
२. जास्त काळ ताजेपणा टिकून राहण्यासाठी ते फ्रीजपेक्षा फ्रिजरमध्येच ठेवणे योग्य राहील.
३. दही काढताना नेहमी स्वच्छ चमचा वापरा.
४. दही वारंवार रुम टेम्परेचरवर जास्त वेळ ठेऊ नका.
