Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकदा मळून ठेवलेली कणीक फ्रिजमध्ये किती दिवस ठेवावी? तज्ज्ञ सांगतात, इतक्या वेळेनंतर होते विषासमान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2025 14:01 IST

How long does atta last in the fridge : Storing atta in the refrigerator : How many days can wheat flour dough stay fresh in fridge : फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक दिसायला जरी ठीक वाटत असली तरी, तिच्यात अनेक बदल होत असतात...

दिवसभराच्या धावपळीत वेळ वाचवण्यासाठी अनेकजणी एकदाच कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवतात. यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाकासाठी लागणारा वेळ वाचतो, हे खरे आहे. पण ही कणीक किती दिवस सुरक्षित राहते, तिची चव - गुणवत्ता बदलते का, आरोग्यावर काही परिणाम होतो का याबाबत अनेकांना संभ्रम असतो. चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त दिवस ठेवलेली कणीक आंबट होते, रंग गडद होतो आणि त्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कणीक ताजी, मऊ आणि सुरक्षित राहण्यासाठी योग्य स्टोरेज पद्धत आणि किती दिवस ठेवावी याची मर्यादा जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे(How many days can wheat flour dough stay fresh in fridge).

'रेडी-टू-यूज' कणीक आरोग्याच्या दृष्टीने किती सुरक्षित आहे आणि फ्रिजमध्ये ती जास्तीत जास्त किती दिवस साठवून ठेवता येते, याबद्दल अनेकींना बरीचशी माहिती नसते. जास्त दिवस ठेवलेली कणीक वापरल्याने पौष्टिक मूल्य कमी होते की अपचनाचा धोका वाढतो. एकदा मळून ठेवलेली कणीक फ्रिजमध्ये स्टोअर करण्याची योग्य पद्धत कोणती आणि तिचे शेल्फ लाइफ नेमके किती असते? मळलेली कणीक फ्रिजमध्ये नेमकी किती दिवस टिकू शकते आणि ती खराब होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी (How long does atta last in the fridge) घ्यावी ते पाहूयात. फिटनेस कोच प्रियांक मेहता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगतात की, फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक दिसायला जरी ठीक वाटत असली तरी, तिच्यात अनेक बदल होत असतात, जे आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

एकदा मळून ठेवलेली कणीक फ्रिजमध्ये स्टोअर केल्याने नेमके काय होते ? 

फर्मेंटेशन थांबत नाही, फक्त मंदावते... 

फिटनेस कोचच्या मते, अनेकदा आपल्याला वाटते की, फ्रिजमध्ये ठेवल्याने कणीक खराब होणे थांबते. परंतु सत्य हे आहे की, थंड तापमान फक्त ही प्रक्रिया मंद करते, थांबवत नाही. कणकेत असलेले यीस्ट आणि बॅक्टेरिया हळूहळू काम करत राहतात, ज्यामुळे कार्बन डायऑक्साइड (CO₂) आणि  अ‍ॅसिड तयार होऊ लागतात. याचा परिणाम कणकेच्या चवीवर आणि वासावर होतो. दोन दिवसांनंतर कणकेत हलका आंबटपणा आणि टेक्श्चरमध्ये बदल जाणवू लागतो.

किलोभर मटार सोला झटपट! ३ ट्रिक्स-मटार सोलायचे किचकट काम करा काही मिनिटांत पटपट...

गॅस आणि ब्लोटिंगची समस्या वाढू शकते... 

फर्मेंटेशन वाढल्यावर कणकेतील ग्लूटेन सैल पडते. याचा अर्थ, पोळी तितकी फुगलेली आणि मऊ तयार होत नाही; ती बहुतेक वेळा जाड आणि चघळायला जड लागते. अशा कणकेला पचायलाही वेळ लागतो आणि काही लोकांना यामुळे गॅस, जड वाटणे किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवू शकतो.

पोषक तत्व कमी होऊ लागतात... 

जास्त वेळ ठेवलेली कणीक हळूहळू आपली गुणवत्ता गमावू लागते. फर्मेंटेशनमुळे व्हिटॅमिन आणि मिनरल तुटू लागतात. म्हणजे, पोळीने पोट तर भरेल पण ताज्या कणकेत मिळते तेवढे पोषण मिळणार नाही.

पुलाव, बिर्याणी ओलसर होते, चिकट, गचका होऊन लगदाच होतो? ५ टिप्स - प्रत्येक दाणा दिसेल मोकळा,सुटसुटीत...   

रक्तातील साखरेवर परिणाम... 

वेळेनुसार कणकेत असलेले स्टार्च वेगाने तुटू लागते. या कणकेची पोळी खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. अशा परिस्थितीत, विशेषतः जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल किंवा वजन नियंत्रणाकडे लक्ष देत असाल, तर स्टोअर करून ठेवलेल्या कणकेची पोळी खाणे टाळा.

एकदा मळून ठेवलेली कणीक किती दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये ठेवावी ? 

या प्रश्नाचे उत्तर देताना फिटनेस कोच सांगतात, साधारणपणे ताजी कणीकच आरोग्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. जितकी गरज असेल तितकीच कणीक मळण्याचा प्रयत्न करा. जर ठेवावीच लागली, तर २४ तासांपेक्षा जास्त ठेवू नका. यामुळे चव चांगली राहील, पोळी मऊ बनेल आणि पचनही सोपे होईल. फ्रिजमध्ये एकदाच मळून ठेवलेली कणीक आपला कामाचा ताण आणि वेळ तर वाचवते, पण जास्त वेळ ठेवल्यास चव, पोषण आणि पचन या तिन्हींवर वाईट  परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोज ताजी कणीक मळा आणि २४ तासांच्या आत त्याचा वापर करणे हेच उत्तम राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : How long to keep kneaded dough in fridge? Experts warn!

Web Summary : Storing kneaded dough in the fridge saves time, but experts warn against keeping it too long. Fermentation continues, affecting taste, texture, and nutritional value. It can cause digestive issues and raise blood sugar. Use within 24 hours for optimal health.
टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.