Join us

Traditional Food : मुसळदार पावसात गरमागरम वाफाळत्या चहासोबत बिस्किट नको खा पारंपरिक मुगाची मठरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 16:19 IST

Homemade Moong Dal Matri : Homemade Moong Dal Matri : Moong Dal Matri recipe : How to make Moong Dal Matri : Crispy Moong Dal Matri : मुसळधार कोसळणाऱ्या पावसात वाफाळत्या चहासोबत मूग डाळीची मठरी असा झक्कास बेत होऊ शकतो.

पावसाळा असो किंवा हिवाळा, गरमागरम, पौष्टिक आणि चविष्ट अशी मटरी खाण्याची मजा काही औरच असते! खरंतर, संध्याकाळच्या टी - टाईम स्नॅक्सच्या (Homemade Moong Dal Matri) वेळी आपल्याला थोडी भूक लागतेच. टी टाईम स्नॅक्सच्या वेळची छोटीशी भूक भागवण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ खातो त्यापैकीच एक खास पदार्थ (Homemade Moong Dal Matri) म्हणजे मठरी... मठरी वेगवेगळ्या पद्धतीने तयार (Moong Dal Matri recipe) केली जाते, यातही विशेषतः पिवळ्या मुगाच्या डाळीची मठरी पौष्टिक आणि चवीला देखील उत्तम लागते. पिवळी मुगडाळ ही हलकी, सहज पचणारी आणि प्रथिनयुक्त असल्याने ती शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही मठरी आवडते, कारण ती चवीला (How to make Moong Dal Matri) कुरकुरीत आणि आरोग्यदायी देखील असते. हलकी, पचायला सोपी आणि ( Crispy Moong Dal Matri) प्रथिनयुक्त ही मुगाच्या डाळीची मठरी विशेषतः पावसाळ्यात किंवा थंड हवामानात शरीराला उष्णता देणारी आणि तृप्त करणारी ठरते. यासाठीच, मुसळधार कोसळणाऱ्या पावसात वाफाळत्या चहासोबत मूगडाळीची मठरी असा झक्कास बेत होऊ शकतो. घरच्याघरीच मूग डाळीची पौष्टिक मठरी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.  

साहित्य :- 

१. पिवळी मूग डाळ - १ कप (पाण्यांत भिजवलेली)२. जिरे - १/२ टेबलस्पून ३. हळद - १ टेबलस्पून४. मिठ - चवीनुसार५. काळीमिरीपूड - १/४ टेबलस्पून ६. कलोंजी - १/२ टेबलस्पून७. कसुरी मेथी - १ टेबलस्पून ८. ओवा - १ टेबलस्पून९. बारीक रवा - १/२ कप १०. गव्हाचे पीठ - १/२ कप ११. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून  १२. तेल - तळण्यासाठी १३. पाणी - गरजेनुसार१४. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून

साजूक तूप कढवताना बिघडते? लोण्यात  २ पदार्थ मिसळा - तूप होईल रवाळ रंगही येईल मस्त...

कढई - तव्याच्या कडेला साचला काळाकुट्ट थर? १ भन्नाट ट्रिक - न घासताच होईल मिनिटांत चकाचक...

कृती :- 

१. ५ ते ६ तास पाण्यांत भिजवलेली पिवळी मूग डाळ एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन ती किंचित पाणी घालून व्यवस्थित वाटून घ्यावी. २. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पिवळी मूग डाळ एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. ३. आता या बॅटरमध्ये मीठ, जिरे, हळद, काळीमिरी पूड, कलोंजी, ओवा, कसुरी मेथी असे सगळे मसाल्यांचे पदार्थ घालावेत. ४. मग यात बारीक रवा, गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, साजूक तूप घालावे. गरजेनुसार थोडे पाणी घालून मठरी साठीचे पीठ मळून घ्यावे. ५. आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, साजूक तूप घालून ते एकत्रित करुन त्यांची पेस्ट तयार करुन घ्यावी. 

६. तयार मठरीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करुन ते लाटून घ्यावेत. पुरीच्या आकाराची गोलाकार पारी लाटून घ्यावी मग या पारीला गव्हाचे पीठ व साजूक तुपाची पेस्ट पसरवून लावून घ्यावी. मग त्याला मठरीचा आकार देण्यासाठी त्रिकोणी घडी घालून फोल्ड करुन घ्यावे. ७. तयार मठरी गरम तेलात खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. 

टी - टाईम स्नॅक्ससाठी मस्त कुरकुरीत, खुसखुशीत पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची मठरी खाण्यासाठी तयार आहे. वाफाळत्या चहासोबत अशी खमंग चवीची मठरी खाण्याचा आनंद लुटा.

टॅग्स :अन्नपाककृतीपाऊस