कुठलंही हॉटेल असो किंवा घरात एखादा स्पेशल मेन्यू ट्राय करायचा असू देत सगळ्यांची पसंती असते ती पनीरला. (creamy paneer at home) स्टार्टर डिशपासून ते अगदी जेवणाच्या ताटापर्यंत पनीर असते. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांच्या आवडीचे पनीर. अगदी मऊ आणि चवीला खाण्यासाठी खूप मस्त लागणारा पदार्थ.(quick panner recipe)
पालक पनीर, पनीर पकोडा, पनीरची भाजी, पनीर रोल असे विविध पदार्थ पनीरपासून बनवता येतात.(Soft paneer like dairy) पनीरपासून घरच्या घरी कोणता पदार्थ करायचा असेल तर पनीर बाहेरुन विकत आणलं जातं. बाहेरुन आणलेलं पनीर कधी कधी आंबट, कडक किंवा वातड असते. (Perfect soft paneer recipe) ज्यामुळे पदार्थाची चव बिघडते. सणउत्सवांच्या काळात अनेकदा भेसळयुक्त पनीर विकलं जातं. अशाप्रकारचे पनीर खाल्ल्याने आपल्याला पोटदुखीचा त्रास उद्भवू लागतो. घरी बनवलेल्या पनीरपासून आपण गोडाचा पदार्थ किंवा पनीरची भाजी आणि इतर पदार्थ बनवू शकतात. घरच्या घरी पनीर कसं बनवायचं पाहूया.
घरात पनीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला म्हशीचे ताज दीड लिटर दूध उकळवण्यासाठी ठेवावं लागेल. पनीर बनवताना दूध पाच मिनिटांपेक्षा जास्त तापवून नका. नाहीतर पनीर चिवट होते.
दुधाला कडेने बुडबुडे यायला लागले की त्यात एक छोटा चमचा मीठ घाला आणि वरुन दोन मध्यम आकाराचा लिंबू पिळा. दूध फुटण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ साधारणत: लागतो. त्यासाठी दुधाला व्यवस्थित उकळी येऊ द्या.
पनीर आता तयार झालं आहे. गॅस बंद करा. त्यानंतर त्यात ग्लासभर पाणी घाला. कापडाच्या पिशवीतून पनीर गाळून घ्या. पिशवीमधे पनीर फ्लिटर करुन घेऊ. त्यानंतर लगेच थंड पाणी घालून धुवून घेऊया. म्हणजे ते चिवट होणार नाही. शक्य तितक पाणी काढून घ्या. त्यानंतर एका वाटीत किंवा भांड्यात कापडाच्या पिशवीसह पनीर ठेवा. त्यावर जाड भांड ठेवा. ज्यामुळे पाणी निघून जाण्यास मदत होईल. तसेच पनीर नीट तयार होईल. दोन तासानंतर पनीर व्यवस्थित सेट होईल.