वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण नेहमीच करतो. पण त्या भाज्यांना कधी कधी जी एकसारखी चव येते ती बऱ्याचदा नकोशी वाटते. टेस्टमध्ये थोडा बदल हवा असतो. अशावेळी मग आपण विकत मिळणारे वेगवेगळे मसाले भाज्यांमध्ये घालतो आणि भाजी जास्त चवदार करण्याचा प्रयत्न करतो. विकतच्या मसाल्यांमध्ये खूप प्रिझर्व्हेटीव्ह असतात असं म्हटलं जातं. म्हणूनच आता विकतच्या मसाल्यांच्या ऐवजी भाजीमध्ये एक घरीच तयार केलेला सुपरटेस्टी मसाला घालून पाहा (home made sabji masala for delicious dishes). या मसाल्यांमुळे भाजी, आमटी किंवा वरण, पराठे अशा सगळ्याच पदार्थांना आणखी छान चव येईल. तो मसाला कसा तयार करायचा ते पाहूया..(how to make kitchen king masala at home?)
भाज्यांमध्ये घालण्यासाठी खमंग मसाला कसा तयार करायचा?
साहित्य
२ चमचे धणे
१ चमचा बडिशेप
१ चमचा जिरे
लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना
८ ते १० मिरे
१ टीस्पून मोहरीची डाळ
पाव चमचा हिंग
७ ते ९ सुकलेल्या लाल मिरच्या
कृती
घरच्याघरी भाज्यांसाठी मसाला तयार करण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा.
त्यानंतर कढई गरम झाल्यावर धणे, जिरे, बडिशेप, मिरे आणि मोहरीची डाळ हे सगळं साहित्य मंद आचेवर गरम करून ठेवा. हा मसाला भाजत असताना गॅस अजिबात मोठा करू नये. यामुळे मसाल्यांना जळकट वास लागतो.
भाजून घेतलेले पदार्थ एका मोठ्या भांड्यात काढा आणि ते थंड होऊ द्या. त्यानंतर कढईमध्ये लाल मिरची घाला आणि ती ही हलकी भाजून घ्या.
सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि अगदी बारीक पावडर तयार करा. जेवढी बारीक पावडर तयार कराल तेवढा त्यामधल्या मसाल्यांचा स्वाद जास्त खुलतो.
घरोघरी गोकर्णाचा वेल असायलाच हवा, कारण.... बघा गोकर्णाच्या फुलांचे ४ आरोग्यदायी फायदे
सगळ्यात शेवटी या मसाल्यामध्ये थोडी हिंग पावडर आणि थोडी आमचूर पावडर घालावी. हा मसाला तुम्ही भाज्यांपासून ते पराठ्यांपर्यंत कित्येक पदार्थांमध्ये घालू शकता. शिवाय हा मसाला एकदा करून ठेवला तर तो महिनाभर चांगला टिकतो.
Web Summary : Skip store-bought masalas! This recipe details how to create a flavorful homemade masala perfect for enhancing the taste of vegetables, lentils, parathas and more. Enjoy preservative-free deliciousness!
Web Summary : बाजार से मसाले खरीदना छोड़ें! यह नुस्खा बताता है कि स्वादिष्ट होममेड मसाला कैसे बनाएं जो सब्जियों, दालों, पराठों और अन्य व्यंजनों का स्वाद बढ़ाने के लिए बिल्कुल सही है। प्रिजर्वेटिव-मुक्त स्वादिष्टता का आनंद लें!