अशा अनेक भाज्या आहेत, ज्यांचा वापर आपण फार करत नाही. अगदी कधीतरीच करतो. (holiday special - see the cauliflower pakoda recipe)घरच्यांनाही ती भाजी फार आवडते असे नाही. जसं की फुलकोबी. फुलकोबीला बरेच जण पत्ताकोबीच समजतात. मात्र दोन्ही वेगवेगळ्या भाज्या आहेत. मुख्य म्हणजे दोन्ही भाज्यांपासून उत्तम भजी तयार करता येते. साध्या पत्ताकोबीची भजी तर आपण बरेचदा खातो. मात्र फुलकोबी पुलावासाठी किंवा कधीतरी रस्सा भाजी करण्यासाठी आपण वापरतो. (holiday special - see the cauliflower pakoda recipe)या फुलकोबीची भजी मस्त कुरकुरीत तसेच अगदी चविष्ट होते. तयार करायलाही अगदीच सोपी आहे पाहा काय कराल.
साहित्य
फुलकोबी, मीठ, लाल तिखट, तेल, तांदळाचे पीठ, बेसन, जिरे पूड, पाणी, हळद, आले, लसूण
कृती
१. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. फुलकोबीचे हाताने तुकडे करून घ्या. ते बारीक करू नका. अख्खेच ठेवा. आता गरम केलेल्या पाण्यामध्ये मीठ घाला. हळद घाला. कापलेले फुलकोबीचे तुकडे घाला आणि जरा उकळू द्या. अगदीच मऊ करू नका. पण कच्चाही ठेवायचा नाही.
२. एका भांड्यामध्ये तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये बेसन टाका. बेसन जर वाटीभर वापरत असाल तर, तांदळाचे पीठ अर्धी वाटी वापरा. आता त्या पीठामध्ये आलं-लसूण पेस्ट घाला. नंतर लाल तिखट घाला. रंगाचे तिखट वापरा. जिरे पूड घाला. थोडी हळद घाला. चवीनुसार मीठ घाला. थोडं गरम तेल घाला. मग पाणी घालून सगळं छान कालवून घ्या. जास्त पातळ करू नका. भजी तयार करताना ज्या पद्धतीने बेसन भिजवता त्याच पद्धतीने तयार करा.
३. फुलकोबीचे तुकडे जरा पिवळे दिसायला लागले आणि थोडे मऊ झाले की गॅस बंद करा. पाणी काढून घ्या. ते तुकडे छान निथळवून घ्या. जरा सुखले की मग ते तयार केलेल्या बेसन पीठामध्ये टाका. फुलकोबीला तयार मसाला व्यवस्थित लावून घ्या.
४. गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवा. तेल गरम झाले की मग तयार मिश्रण तळून घ्या. तळायला जरा वेळ लागतो. त्याशिवाय भजी कुरकुरीत होत नाही. जर तुम्ही एअरफ्रायर वापरत असाल तर ही रेसिपी तशीही तयार करता येते.
५. भजी मस्त लाल आणि कुरकुरीत झाली की ताटात काढून घ्या. आवडत्या चटणीशी लाऊन खा.