Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? सोप्या टिप्स - होतील खुसखुशीत, तेलही होणार नाही खराब

करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? सोप्या टिप्स - होतील खुसखुशीत, तेलही होणार नाही खराब

Karanji recipe: Crispy karanji tips: Gujiya frying tips: या होळीला आपली करंजी परफेक्ट व्हावी, यासाठी ७ सोप्या टिप्स लक्षात ठेवा. यामुळे तुमचं तेलही खराब होणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2026 16:16 IST2026-03-01T16:15:31+5:302026-03-01T16:16:06+5:30

Karanji recipe: Crispy karanji tips: Gujiya frying tips: या होळीला आपली करंजी परफेक्ट व्हावी, यासाठी ७ सोप्या टिप्स लक्षात ठेवा. यामुळे तुमचं तेलही खराब होणार नाही.

Holi special Why do karanjis burst while frying How to make crispy karanji at home Tips to prevent gujiya from breaking in oil How to fry karanji without oil getting spoiled Secrets to perfect crispy karanji | करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? सोप्या टिप्स - होतील खुसखुशीत, तेलही होणार नाही खराब

करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? सोप्या टिप्स - होतील खुसखुशीत, तेलही होणार नाही खराब

होळीचा सण म्हणजे गोडाचे पदार्थ आणि रंगांची उधळण. या दिवशी घरोघरी पुरणपोळीच्या आस्वादासह खुसखुशीत करंज्या आणि मिठाईचा सुवास दरवळू लागतो.(Karanji recipe) पण अनेकदा गृहिणींची एकच तक्रार असते. करंज्या तेलात टाकताच फुटतात, सारण बाहेर येतं आणि सगळं तेल काळं होतं. कधी कधी तर करंज्या तळल्यानंतर लगेच मऊ पडतात, तर कधी हव्या तशा कुरकुरीत होत नाहीत. सणासुदीच्या गडबडीत या चुकांमुळे पुन्हा पदार्थ बनवण्याची इच्छा होत नाही. (Crispy karanji tips)
करंजी परफेक्ट होण्यासाठी फक्त पीठ मळणं किंवा सारण भरणं पुरेसं नसतं.(Holi special sweets) तर काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर आपली एकही करंजी फुटणार नाही आणि मऊही पडणार नाही.(Gujiya frying tips) या होळीला आपली करंजी परफेक्ट व्हावी, यासाठी ७ सोप्या टिप्स लक्षात ठेवा. यामुळे तुमचं तेलही खराब होणार नाही. 

बिनाखोबऱ्याची साऊथ इंडियन चटणी, इडली-डोशासोबत लागते मस्त! ना नारळ फोडण्याची झंझट-ना खोबरं खवण्याची घाई

1. करंजीसाठी पीठ मळताना त्यात २ चमचे साजूक तुपाचे कडकडीत मोहन घाला. यामुळे करंजीला छान पापुद्रा येतो आणि ती बराच वेळ खुसखुशीत राहते.

2. करंजीच्या कडा दुमडण्यापूर्वी कडेने थोडं दूध किंवा पाणी लावायला हवं. यामुळे करंजी तेलात सुटत नाही आणि सारण व्यवस्थित राहतं. 

3. करंजी भरल्यानंतर टूथपिक किंवा छोट्या सुईने तिला एक-दोन ठिकाणी अगदी बारीक छिद्र पाडा. यामुळे तळताना आतील वाफ बाहेर निघून जाते आणि हवेच्या दाबामुळे करंजी फुटत नाही.

4. करंजी तळण्यासाठी तेल जास्त कडक तापवू नका. मध्यम आचेवर तेल गरम झाल्यावरच करंज्या त्यात सोडा. अति गरम तेलात करंजी टाकल्यास त्यावर बुडबुडे येतात, ज्यामुळे ती मऊ पडते. 

5. करंजीमध्ये गरजेपेक्षा जास्त सारण भरु नका. जास्त सारण भरल्यास तळताना ती फुगते आणि कडांमधून फाटते. चमचाभर सारण पुरेसे असते.

6. करंज्या लाटून झाल्यावर त्या उघड्यावर ठेवू नका. लाटलेल्या करंज्या सुती कापडाने झाकून ठेवा. ज्यामुळे त्या सुकणार नाहीत आणि तळताना फुटणार नाहीत. 

7. करंजीचे सारण करताना सारणासाठी रवा बारीक घ्या. खोबरं घालणार असाल तर हलकं भाजून घ्या. ज्यामुळे खोबऱ्याचा खवट वास येणार नाही. 

Web Title : खस्ता करंजी रहस्य: इस होली में फटने, नरम होने और तेल खराब होने से बचाएं!

Web Summary : इन आसान टिप्स के साथ इस होली पर एकदम सही करंजी बनाएं! फटने से रोकें, खस्ता रखें और तेल को खराब होने से बचाएं। निर्दोष परिणामों के लिए इन सात आसान चरणों का पालन करें।

Web Title : Crispy Karanji Secrets: Prevent Cracking, Softness, and Oil Spoilage This Holi!

Web Summary : Make perfect Karanjis this Holi with these simple tips! Prevent cracking, keep them crispy, and avoid oil spoilage. Follow these seven easy steps for flawless results.