Join us

साधं मीठ सोडून रोज हिमालयन पिंक सॉल्ट खाता का? वेळीच व्हा सावध, छळतील आरोग्याच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:47 IST

Himalayan Pink Salt: नॅचरल मिनरल्स आणि डिटॉक्सचे भरपूर गुण असूनही हे मीठ शरीरात आयोडिनची कमतरता करू शकतं. डॉक्टरांनी हे मीठ खाण्याबाबत काही इशारे दिले आहेत. 

Himalayan Pink Salt: मीठ केवळ पदार्थांची टेस्ट वाढवत नाही तर आरोग्यालाही अनेक फायदे देतं. आधी सगळे लोक एकाच प्रकारचं मीठ वापरत होते. पण तेच नेहमीच मीठ न वापरता अलिकडे लोक वेगवेगळ्या प्रकारचे मीठ वापरत आहेत. बरेच लोक हिमालयन सॉल्टचा वापर करत आहेत. पण याचा वापर करत असताना याचे आरोग्याला फायदे होतात की नाही याचा विचारही केला जात नाही. केवळ कुणी सांगितलं म्हणून लोक याचा आहारात समावेश करतात. तुम्ही सुद्धा नेहमीच मीठ सोडून जरा सावध होण्याची गरज आहे. कारण नॅचरल मिनरल्स आणि डिटॉक्सचे भरपूर गुण असूनही हे मीठ शरीरात आयोडिनची कमतरता करू शकतं. डॉक्टरांनी हे मीठ खाण्याबाबत काही इशारे दिले आहेत. 

हिमालयन पिंक सॉल्ट काय आहे?

हिमालयन पिंक सॉल्टला सैंधव मीठ असंही म्हटलं जातं. हे मीठ दिसायला गुलाबी असतं. यात कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण कमी असतं. नेहमीच्या मिठापेक्षा यात कमी सोडिअम असतं. या मिठाची टेस्ट खारट कमी आणि गोड जास्त असते. केक आणि कुकीज बनवण्यासाठी या मिठाचा वापर केला जातो. 

'या' मिठानं आयोडिन कमी होतं का?

इन्स्टावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत डॉ. अली काजेमी यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला. ते म्हणाले की, भारतात आयोडिनची कमतरता असल्याच्या केसेस अचानक वाढल्या आहेत. यामागचं एक मोठं कारण म्हणजे हिमालनय सॉल्ट म्हणजेच सी सॉल्ट. ज्यात आयोडिन जास्त नसतं. डॉ. काजेमी यांनी इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं की, एकेकाळी जवळपास संपलेली आयोडिनची कमतरता आता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. याचं कारण हिमालयन सॉल्ट ठरत आहे.

आयोडिन इतकं गरजेचं का?

डॉ. काजेमी सांगतात की, आयोडिन आपल्या शरीरातील एक महत्वाचं पोषक तत्व आहे. खासकरून थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य, प्रेग्नेंसीमध्ये भ्रूणाच्या मेंदुची वाढ आणि बाळाच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी खूप महत्वाचं असतं.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन(WHO) च्या एका शोधात, भारत, चीन, जर्मनी, इटली, मलेशिया आणि साउथ आफ्रिकासारख्या देशांमधील 20 हजारांपेक्षा जास्त लोकांचा समावेश करण्यात आला होता. या शोधातून आढळून आलं की, आयोडिन सप्लीमेंटेशननं आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारात आणि मृत्यूच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

साधं मीठ आणि पिंक सॉल्टमध्ये फरक

- टेबल सॉल्ट म्हणजे साध्या मिठात आयोडिन अनेकदा मिक्स केलं जातं. तर हिमालयन पिंक सॉल्टमध्ये नॅचरली आयोडिन नसतं.

- टेबल सॉल्टमध्ये मिनरल्स कमी असतात, पण पिंक सॉल्टमध्ये 80 पेक्षा जास्त ट्रेस मिनरल्स असतात, पण यांचं प्रमाण खूप कमी असतं.

- टेबल सॉल्टमध्ये खारटपणा जास्त असतो, तर पिंक सॉल्टमध्ये कमी असतो.

- थायरॉइडसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी टेबल सॉल्ट फायदेशीर ठरतं. तर हिमालयन सॉल्ट यात कमी पडतं. 

अनेक एक्सपर्ट्स सांगतात की, हिमालयन सॉल्ट, रिफाइंड टेबल सॉल्टच्या तुलनेत काही बाबतीत अधिक चांगलं ठरू शकतं. पण आहारातून टेबल सॉल्ट पूर्णपणे बाजूला करून हिमालयन सॉल्ट खात असाल तर आयोडिन कमी होण्याचा धोका वाढू शकतो. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स