Lokmat Sakhi >Food > School Tiffin Box Recipe : शाळेच्या डब्यासाठी कुरकुरीत दोडक्याचा टाकोज! नावडती दोडकीही होतील आवडती

School Tiffin Box Recipe : शाळेच्या डब्यासाठी कुरकुरीत दोडक्याचा टाकोज! नावडती दोडकीही होतील आवडती

Protein-rich lunch box recipes : School Tiffin Box Recipe: भरपूर प्रोटीन असलेले दोडक्याचे टाकोज कसे करायचे पाहूया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2025 11:07 IST2025-08-17T11:04:15+5:302025-08-17T11:07:59+5:30

Protein-rich lunch box recipes : School Tiffin Box Recipe: भरपूर प्रोटीन असलेले दोडक्याचे टाकोज कसे करायचे पाहूया..

Healthy school tiffin box recipes for kids morning breakfast idea How to make crispy dodkyache tacos at home Protein-rich lunch box recipes | School Tiffin Box Recipe : शाळेच्या डब्यासाठी कुरकुरीत दोडक्याचा टाकोज! नावडती दोडकीही होतील आवडती

School Tiffin Box Recipe : शाळेच्या डब्यासाठी कुरकुरीत दोडक्याचा टाकोज! नावडती दोडकीही होतील आवडती

मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत पण त्यांच्या खाण्या-पिण्याचे नखरे सहन करताना पालकांच्या नाकीनऊ येतात. (lunch box recipes)शाळेच्या डब्यात काय द्यावं किंवा नाश्त्याला काय करावं हा प्रश्न घरोघरी महिलांना अधिक त्रास देतो. आज काय स्पेशल? असा प्रश्न मुलं वारंवार विचारतात.(School Tiffin Box Recipe) बाहेरचे जंकफूड खाऊ घातले की, मुलांसह घरातील इतर मंडळी देखील आजारी पडण्याची भीती असते.(Healthy school tiffin box recipes) मुलांना भाज्या खायला आवडत नाही. पण त्याच भाज्यांना वेगळा काही ट्विस्ट दिला तर ते नक्कीच खातील. (crispy dodkyache tacos)
दोडक्याची भाजी सहसा आपल्या घरात बनवली जात नाही.(Protein-rich lunch box) शिवाय सकाळचा नाश्ता हेल्दी, आवडीचा आणि पोटभरीचा असेल तर मुलांना सतत भूक लागत नाही.(morning breakfast idea) डब्यात त्यांच्या आवडीचे पदार्थ दिले तर ते आवडीने फस्त करतात. म्हणून मुलांच्या डब्यात एकदा तरी दोडक्याचे टाकोज देऊन पाहा. हा पदार्थ ते आवडीने खातील.(Health tips) यामध्ये भरपूर प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असते. हा टाकोज कसा बनवायचा? यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

भाजी-आमटीत 'या' पद्धतीने घाला गरम मसाला, ९० टक्के लोक करतात १ चूक- छातीत जळजळ- अपचनाचा होतो त्रास

साहित्य 

दोडक - १ 
कोथिंबीर - १ वाटी 
जिरे - १ चमचा 
हळद - १ चमचा 
लाल मिरची पावडर - १ चमचा 
धणे-जिरे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ छोटा चमचा 
मीठ - चवीनुसार 
रवा - १ मोठा चमचा 
गव्हाचे पीठ - १ चमचा 
बेसन - १ चमचा 
मिक्स हर्ब्स - १ चमचा 
पाणी - आवश्यकतेनुसार 
तूप - १ चमचा 
टोमॅटो सॉस 
उकडलेला मका - १ वाटी 
चीज - आवश्यकतेनुसार 


कृती 

1. सगळ्यात आधी दोडके धुवून त्याच्या वरचे सालं काढून घ्या. आता त्याचे २ तुकडे करुन किसून घ्या. यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर, जिरे, हळद, लाल मिरची पावडर, धणे-जिरे पावडर, गरम मसाला, मीठ, रवा, गव्हाचे पीठ, बेसन, मिक्स हर्ब्स आणि पाणी घालून व्यवस्थित बॅटर तयार करा. 

2. बॅटर तयार झाल्यानंतर आता पॅन गरम करुन त्यात तूप घाला. तूप संपूर्ण पॅनवर पसरवून त्यावर छोट्या आकाराचा पोळा तयार करा. दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजल्यानंतर त्यावर टोमॅटो सॉस पसरवा. आता त्यात उकडलेला मका आणि वरुन चीज घाला. एक बाजू बंद करुन चीज व्यवस्थित वितळू द्या. तयार होईल मुलांच्या आवडीचा पौष्टिक नाश्ता. 

गणेशोत्सव २०२५ : बाप्पाच्या स्वागतासाठी यंदा फक्त १० मिनिटांत करा बिस्किटांचा मोदक- मुलांनाही आवडतील खूप

3. दोडक्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. यामध्ये फायबर आणि पाण्याचे उत्तम स्त्रोत असते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या दूर होतात. पचनक्रिया सुधारते. यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हाडांसाठी आणि सांध्यांसाठी दोडका बहुगुणी आहे. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. 


Web Title: Healthy school tiffin box recipes for kids morning breakfast idea How to make crispy dodkyache tacos at home Protein-rich lunch box recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.