उन्हाळ्याचा सिझन सुरु झाला की, रणरणत्या,कडकडीत उन्हाचा त्रास आपल्यापैकी बऱ्याचजणांना होतोच. विशेषतः या ऋतूमध्ये आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देणं अधिक गरजेचं असतं...उन्हाळा सुरू झाला की डिहायड्रेशन, अपचन आणि थकवा या समस्या डोकं वर काढतात. यासाठीच या काळात हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून पोटावरचा ताण कमी होईल. उन्हाळ्याच्या या वाढत्या तडाख्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण फक्त पाणी पिण्यावर भर देतो. पण फक्त पाणी पिणे पुरेसे नाही, तर आपल्या ताटात काय आहे यावरही आपले आरोग्य अवलंबून असते. उन्हाळ्यात हेवी जेवण पचवणे पोटासाठी थोडं अवघड ठरत, जर थोडा जरी निष्काळजीपणा केला, तर आपण आजारी पडू शकतो(which is better options for summer chapati or jowar bhakri)
साधारणपणे आपल्याकडे घरोघरी, प्रत्येक ऋतूत हमखास फक्त गव्हाचीच चपाती खाल्ली जाते. पण ते शरीरासाठी किती योग्य आहे? नुकतेच प्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांची एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, यामध्ये त्यांनी ऋतूप्रमाणे कोणती भाकरी किंवा चपाती खावी, याबद्दल माहिती दिली आहे. अनेकदा आपण वर्षभर न चुकता गव्हाची चपाती खातो, पण मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे, ऋतूप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या (which roti is best for hot weather) पिठाच्या चपात्या किंवा भाकरी खाणं गरजेचं आहे. मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी उन्हाळ्यात गव्हाच्या चपातीला एक उत्तम पर्याय सांगितला आहे. शरीर आतून थंड ठेवण्यासाठी आणि उन्हाळ्याचा त्रास (healthy roti options for summer) टाळण्यासाठी नक्की कोणत्या पिठाची भाकरी किंवा चपाती खावी ते पाहूयात... (best flour for summer diet India).
उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम 'जवा'ची (Barley) भाकरी...
उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्यासाठी 'जवा'ची (Barley) भाकरी खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ही भाकरी केवळ पोटासाठी हलकी नसते, तर उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर ती रामबाण उपाय ठरते. जवामध्ये थंड गुणधर्म असतात. ही भाकरी खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन नैसर्गिक थंडावा मिळतो. उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते. जवामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने अन्नाचे पचन नीट होते आणि पोटाचे विकार दूर राहतात. जर तुम्ही तुमच्या आहारात जवाचा समावेश केला, तर शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते आणि डिहायड्रेशनचा धोका टळतो. ज्या लोकांना उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो किंवा लवकर थकवा जाणवतो, त्यांनी 'जवा'ची भाकरी नक्कीच खायला हवी. तुम्ही ही भाकरी नुसती पिठाची न बनवता, त्यात थोडे दही किंवा कोथिंबीर मिसळून अधिक चविष्ट करु शकता.
कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिमचं नको आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...
उन्हाळ्यात आवर्जून खा 'नाचणीची' भाकरी...
मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी उन्हाळ्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय सांगितला आहे, तो म्हणजे 'नाचणीची भाकरी'. नाचणी केवळ चविष्ट नसते, तर ती आरोग्यासाठी 'सुपरफूड' मानली जाते. नाचणीमध्ये थंड गुणधर्म असतात. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी नाचणी अत्यंत गुणकारी आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. जर तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश केला, तर तुमची हाडे मजबूत राहण्यास मदत होते. नाचणी पचायला खूप हलकी असते, ज्यामुळे उन्हाळ्यात पोटावर ताण पडत नाही आणि पोट साफ राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशा वेळी नाचणीची भाकरी खाल्ल्याने आराम मिळतो.
स्तनांचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी करा ५ उपाय! ओघळलेले स्तन होतील सुडौल फिगर...
कधी खावी ज्वारीची भाकरी?
ज्वारीची भाकरी हा असा एक पदार्थ आहे, जो तुम्ही वर्षभर कधीही खाऊ शकता. ही भाकरी प्रत्येक ऋतूत शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात तर ज्वारीचे महत्त्व अधिकच वाढते. ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि बद्धकोष्ठतेसारखे त्रास होत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर आतून थंड ठेवण्यासाठी ज्वारीची भाकरी खूप मदत करते. ज्वारी पचायला हलकी असल्याने पोटावर जास्त ताण पडत नाही आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो.
गव्हाची चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती ?
गव्हाची चपाती तर प्रत्येक घरात रोजच बनवली जाते. हा आपल्या आहारातील अविभाज्य भाग आहे. गव्हामुळे शरीराला भरपूर एनर्जी मिळते आणि ती अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. त्यामुळे तुम्ही दररोज गव्हाची चपाती खाऊ शकता, पण उन्हाळ्यात थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. गव्हाची चपाती शरीराला ताकद देते, म्हणून ती रोजच्या आहारात असणे उत्तम आहे. जर तुम्हाला उन्हाळ्याचा खूप त्रास होत असेल किंवा शरीरात जास्त उष्णता जाणवत असेल, तर रोज फक्त गव्हाची चपाती न खाता मध्ये-मध्ये इतर धान्यांच्या (जसे की ज्वारी, बाजरी किंवा नाचणी) भाकरीचा आहारात समावेश करा. उन्हाळ्यात पचनशक्तीवर ताण पडू नये म्हणून गव्हाच्या चपातीसोबत पालेभाज्या आणि ताकाचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.
नको कडवट ग्रीन टी, ना डाएटिंग! नेहमीच्या चहात करा १ छोटासा बदल - वजन घटेल, पोट होईल सपाट...
उन्हाळ्यात कोणत्या पिठाची चपाती - भाकरी खाणे टाळावे?
ज्याप्रमाणे काही धान्ये उन्हाळ्यात फायदेशीर असतात, तसेच काही धान्ये या ऋतूत शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतात. यामध्ये प्रामुख्याने बाजरी आणि मक्याच्या भाकरीचा समावेश होतो. बाजरी आणि मका हे दोन्ही धान्ये उष्ण प्रकृतीचे मानले जातात. हे शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करतात. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी बाजरी आणि मका खाणे खूप फायदेशीर असते, पण उन्हाळ्यात यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. कडक उन्हात आपली पचनसंस्था मंदावलेली असते. अशा वेळी बाजरी किंवा मका खाल्ल्याने अपचन, पित्त किंवा पोटातील जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, उन्हाळ्याच्या दिवसांत बाजरी आणि मक्याची भाकरी खाणे टाळणेच फायदेशीर ठरेल.त्यामुळे, या उन्हाळ्यात फक्त गव्हाचीच चपाती खाण्यावर अवलंबून न राहता मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी सुचवलेले हे इतरही आरोग्यदायी पर्याय नक्की ट्राय करा. स्वतःला हायड्रेटेड ठेवा, योग्य आहार घ्या आणि उन्हाळ्याचा आनंद लुटा...
Web Summary : For summer, barley and finger millet flatbreads are healthier options than wheat. They aid digestion, cool the body, and prevent dehydration. Jowar can be eaten year-round. Avoid pearl millet and corn in summer.
Web Summary : गर्मी के लिए, जौ और रागी की रोटी गेहूं की तुलना में स्वस्थ विकल्प हैं। वे पाचन में मदद करते हैं, शरीर को ठंडा करते हैं और डिहाइड्रेशन को रोकते हैं। ज्वार को साल भर खाया जा सकता है। गर्मी में बाजरा और मक्का से बचें।