lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > वाटीभर उडीद - मूग डाळीची करा पौष्टीक-लुसलुशीत इडली, प्रोटीनयुक्त डाळींचा बेस्ट नाश्ता

वाटीभर उडीद - मूग डाळीची करा पौष्टीक-लुसलुशीत इडली, प्रोटीनयुक्त डाळींचा बेस्ट नाश्ता

Healthy Idli Recipe Without Rice | Protein Rich Idli : नो राईस इडली एकदा करून तर पाहा, फक्त डाळींचा वापर करून इडली होतात भन्नाट-चवीला जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2023 01:28 PM2023-12-31T13:28:15+5:302023-12-31T13:29:03+5:30

Healthy Idli Recipe Without Rice | Protein Rich Idli : नो राईस इडली एकदा करून तर पाहा, फक्त डाळींचा वापर करून इडली होतात भन्नाट-चवीला जबरदस्त

Healthy Idli Recipe Without Rice | Protein Rich Idli | वाटीभर उडीद - मूग डाळीची करा पौष्टीक-लुसलुशीत इडली, प्रोटीनयुक्त डाळींचा बेस्ट नाश्ता

वाटीभर उडीद - मूग डाळीची करा पौष्टीक-लुसलुशीत इडली, प्रोटीनयुक्त डाळींचा बेस्ट नाश्ता

नाश्त्यामध्ये आपण दाक्षिणात्य पदार्थ आवडीने खातो. इडली (Idli), डोसा, मेदू वडा, डाळ वडा या पदार्थांमुळे पोट तर भरतेच, शिवाय वजन देखील वाढत नाही. यासह आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पांढरीशुभ्र इडली आपण खाल्लीच असेल. योग्य साहित्यांचा वापर केल्यास इडली व्यवस्थित फुलते. मात्र, हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे इडली कडक, किंवा चिकट होतात.

इडली करण्यासाठी आपण तांदूळ, डाळ आणि मेथी दाण्यांचा वापर करतो. पण कधी तांदुळाचा वापर न करता इडली करून पाहिली आहे का? जर आपल्याला इडली खाण्याची इच्छा झाली असेल आणि घरात तांदूळ उपलब्ध नसतील तर, एकदा फक्त डाळींचा वापर करून इडली करून पाहा (Cooking Tips). इडली कापसासारखी सॉफ्ट, मऊसूत तयार होतील. शिवाय त्यातील पौष्टीक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. चला तर मग डाळींची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात(Healthy Idli Recipe Without Rice | Protein Rich Idli).

डाळींची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

मूग डाळ

हिवाळ्यात खायलाच हवी गावरान कारळ्याची खमंग पौष्टीक चटणी, आरोग्यासाठी उत्तम-करायलाही सोपी

पाणी

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी मूग डाळ घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या. नंतर त्यात २ कप पाणी घालून त्यावर ४ ते ५ तासांसाठी झाकण ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ घालून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट रात्रभर किंवा ६ ते ७ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा. ७ तास झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा.

दह्याला सुटलेले पाणी खावे की टाकून द्यावे? तज्ज्ञ सांगतात, दह्याला सुटलेल्या पाण्याचं नक्की करायचं काय?

बॅटर तयार झाल्यानंतर स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडलीच्या पात्राला ब्रशने थोडे तेल लावा. त्यावर चमचाभर बॅटर ओता. इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. १० मिनिटानंतर इडल्या वाफेवर शिजल्या आहेत की नाही, हे चेक करा. नंतर चमच्याने इडल्या काढून चटणीसोबत सर्व्ह करा. अशा प्रकारे डाळींची पौष्टीक इडली खाण्यासाठी रेडी.

Web Title: Healthy Idli Recipe Without Rice | Protein Rich Idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.