Fennel Water : वाढते वेगवेगळे गंभीर आजार पाहून लोक आजकाल आरोग्याची काळजी घेण्याबाबत फारच सजग झालेले बघायला मिळतात. भरपूर लोक तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळ्या समस्या पळवून लावण्यासाठी वेगवेगळे नॅचरल ड्रिंक्स प्यायला लागले आहेत. यात बडीशेपच्या पाण्याचा वरचा क्रमांक आहे. बडीशेपचं पाणी शरीराला अनेक फायदे देणारं ठरतं.
बडीशेपच्या पाण्यात फायबर, कॅल्शिअम, आयर्न, व्हिटामिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्ससहीत अनेक पोषक तत्व असतात. म्हणजे हे नॅचरल ड्रिंक एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करतं. सोबतच हे ड्रिंक शरीरातील काही खास अवयवांसाठी अधिक जास्त फायदेशीर ठरतं. ते अवयव कोणते आणि काय फायदे होतात हे जाणून घेऊ.
गट हेल्थसाठी फायदेशीर
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल बऱ्याच लोकांचं पोट नेहमीच बिघडत राहतं. कधी पोट दुखतं, कधी फुगतं तर कधी गॅस होतो. जर तुम्हाला सुद्धा या समस्या नेहमीच होत असतील तर बडीशेपचं पाणी प्यायला सुरूवात करा. पोटासंबंधी या समस्या या पाण्यानं लगेच दूर होण्यास मदत मिळते. याचं कारण यातील फायबर आणि इतर पोषक तत्व. एका आठवड्यात पोटासंबंधी समस्या दूर होतात.
लिव्हर आणि किडनी डिटॉक्स
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, बडीशेपचं पाणी नियमितपणे प्यायल्यानं बॉडी डिटॉक्स होते. लिव्हरसंबंधी आजारांचा धोका कमी करण्यासाठी बडीशेपचं पाणी नियमितपणे पिऊ शकता. इतकंच नाही तर लिव्हरसोबतच बडीशेपचं पाणी किडनीच्या समस्या दूर करण्यासही मदत करतं. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, वजन कमी करण्यासाठी आणि इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी तुम्ही बडीशेपचं पाणी नेहमी प्यावं.
कसं प्याल बडीशेपचं पाणी?
बडीशेपचं पाणी तयार करणं फारच सोपं आहे. एका ग्लास पाण्यात एका चमचा बडीशेप भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून प्या. हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास अधिक फायदा मिळेल. एकंदर काय तर बडीशेपचं पाणी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.