शिळी पोळी, गूळ तूप पोळी किंवा पोळीचा रोल असे काही नाही काही करतो. इतकेच नाही तर भात उरला तरी आपण फोडणीचा भात, भाताची भजी असे काहीतरी करुन अन्न वाया जाऊ न देता त्याला थोडा ट्विस्ट देतो. पण अनेकदा रात्री भातासोबत केलेली डाळ किंवा वरण जास्ती होते. मग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ही डाळ फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा त्याचे नाश्त्याला काही करता आले तर? तूरीची किंवा मूग, मसूराची डाळ महाग असते. (leftover Dal) डाळीतून शरीराला भरपूर प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे आपण आहारात डाळीचा समावेश करतोच. त्यामुळेच ही डाळ उरली की ती टाकून न घेता नाश्त्याला त्यापासून झटपट आणि चमचमीत काय करता येईल ते पाहूया (Healthy Breakfast Recipe)...
पावसाळ्यात सतत गरम चहा-कॉफी प्यावीशी वाटते? ऍसिडिटी वाढेल, त्यापेक्षा प्या ४ गरमागरम पेयं
१. भजी
डाळ घट्ट असेल तर त्यामध्ये बेसन, थोडे तांदळाचे पीठ, धने-जीरे पावडर, गरजेनुसार मीठ, तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून थोडे घट्टसर पीठ करता येईल. याची गरमागरम भजी केल्यास पावसाळ्याच्या दिवसांत सकाळचा मस्त नाश्ता होईल. यासोबत खोबऱ्याची चटणी, सॉस, ब्रेड असे काहीही घेऊ शकतो. आवडीनुसार यामध्ये लसूण, मीरची, कॉर्न फ्लोअर असे काहीही घालता येईल. यामुळे वरण तर वाया जाणार नाही आणि घरातील मंडळींना ही भजी कशी केली तेही समजणार नाही.
प्रोटीन हवं तर मशरुम खा, मशरूम खाण्याचे ४ फायदे, झटपट होणाऱ्या ३ रेसिपी...
२. थालिपीठ
उरलेल्या शिळ्या वरणाचे थालिपीठ अतिशय खमंग लागते. यासाठी वरणात बसेल इतकेच ज्वारीचे आणि गव्हाचे पीठ घालावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, धने-जीरे पावडर, तिखट, मीठ घालून घट्टसर पीठ मळावे. यामध्ये कोबी, गाजर, बीट अशी कोणतीही भाजी किसून घालू शकतो. त्यामुळे पौष्टीकपणा आणखी वाढतो. तव्यावर तेल लावून पातळ थालिपीठ थापावेत. दोन्ही बाजूने खरपूस भाजून तूप, दही, लसणाची चटणी किंवा लोणचे यांसोबत हे थालिपीठ अतिशय छान लागते. वरण वाया न जाता नाश्त्याला काय करायचे हा प्रश्नही सहज सुटतो.
३. दाल तडका
दाल-तडका हा तर आपल्य सगळ्यांचीच आवडीची गोष्ट. हॉटेलमध्ये जीरा राईस घेतल्यावर आपण आवडीने खाणारा दाल तडका घरी मात्र तसा होत नाही. यासाठी काय करायचे ते पाहूया. मात्र यासाठी आमटी नाही तर घट्ट वरण उरलेले असायला हवे. डाळ चांगली हाटून झाल्यार त्यामध्ये मीठ आणि साखर घालून ते चांगले गरम करुन घ्यावे. फोडणीला जीरे, हिंग, हळद, लसणाचे बारीक तुकडे, कडीपत्ता आणि लाल मिरची घालावी. फोडणी चांगली झाली की ती वरुन या घट्ट वरणावर घालावी. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आवडत असले तर लिंबू पिळल्यास याची चव आणखी छान लागते. वरण कमी असेल आणि थोडे वाढवायचे असेल तर अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो चिरुन यामध्ये घालता येईल. हा दाल तडका नाश्त्याला गरम पोळी किंवा भातासोबत खाता येतो.