Join us  

कोरोनासह साथीच्या आजारांमुळे आलेला अशक्तपणा झटक्यात होईल दूर; फक्त नाष्त्याला हे ७ पदार्था खा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 1:31 PM

Healthy Breakfast ideas : निरोगी जीवनासाठी शरीरात पोषक तत्व असणं फार महत्वाचं असतं. अशक्तपणा दूर करण्याचा आणि उर्जा पातळी टिकवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे निरोगी खाणे.

ठळक मुद्देसकाळी नाष्ता करून झाल्यानंतर आपल्या दिवसभरात खूप काम करावी लागतात. जर आपण सकाळीच पोटभर खाल्लं असेल तर  काळजी नसते. नाष्त्याला पोहे खाल्याने दुसरं काही खाण्याची गरज भासत नाही.व्हिटॅमिन आणि कॅल्शियम समृद्ध, इडली आंबलेल्या तांदळापासून बनविली जाते. त्यात पालक जोडून आपल्या नेहमीच्या इडलीच्या पिठात एकत्र करा. सांभार किंवा नारळाच्या चटणीसह या पालकाच्या इडलीचा आनंद घ्या.

कमकुवतपणापासून शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेदनांपर्यंत कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.  आता या सगळयावर उपाय म्हणजे चांगला आहार घेऊन तुम्ही कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आलेला थकवा  घालवू शकता. कोरोनाशी सामना करत असताना आपलं शरीर एकाचवेळी अनेक कार्य करत असतं. निरोगी जीवनासाठी शरीरात पोषक तत्व असणं फार महत्वाचं असतं.

अशक्तपणा दूर करण्याचा आणि उर्जा पातळी टिकवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे निरोगी खाणे, विशेषत: न्याहारी. आपल्या न्याहारीमध्ये प्रथिने, कर्बोदकं, जस्त, जीवनसत्त्वे आणि ऊर्जा वाढवणारा आहार असावा. आपली उर्जा वाढविण्यासाठी आम्ही तुम्हाला ७ नाष्त्याचे पदार्थ आणि  त्यांच्या सेवनानं होणारे फायदे सांगणार आहोत.   

मेथी, बाजरीचे पराठे

बाजरी आणि मेथी एकत्र करुन न्याहारीसाठी पराठा बनवा. यामुळे शरीरातील जळजळ कमी होईल. तुम्हाला हवे असल्यास पनीर भरलेले पराठेही बनवू शकता. चव वाढविण्यासाठी आपण यासह होममेड व्हाईट बटर आणि दही देखील घेऊ शकता. आपला दिवस सुरू करण्याचा आरोग्यदायी मार्ग कार्ब, प्रथिने, फायबरर्सनी समृद्ध बाजरीचा पराठा असू शकतो. बाजरी ऐवजी तुम्ही  गव्हाच्या पीठाचा किवा मल्टीग्रेनचाही वापर करू शकता.

अंडी

तयार करायला सोपे, स्वादिष्ट आणि प्रोटीन्सचा खजिना असलेली अंडी इंसुलिनचा स्तर मेंटेन करण्याासाठी मदत करतात.  त्यात एंटीऑक्सिडेंटसही मोठ्या प्रमाणात असतात. तुम्ही चपाती किंवा ब्रेडसह अंडी खाऊ शकता. ऑमलेट करून चपातीसह खाणं किंवा उकडलेली अंडीसुद्धा उत्तम पर्याय आहे. 

उपमा

आपल्याला बर्‍याचदा न्याहारीत हलके फुलके पदार्थ खायला आवडतात.  त्यासाठी उपमा आणि घरातील कोणत्याही गोष्टींपेक्षा चांगला पर्याय आहे.  कारण उपमा तयार करत असताना त्यात मसाल्यांचे मिश्रण असते. कढीपत्ता, जिरे असते. हे शरीरासाठी अत्यंत पौष्टीक आहे. उपमा तुम्ही चटणी किंवा सांबारसह खाऊ शकता.

 

ढोकळा

डाळींच्या समावेशामुळे ढोकळ्यांमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाणही वाढते. ढोकळ्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. म्हणून डायबिटीक रुग्णांना नाष्त्यासाठी  हा चांगला पदार्थ आहे. कारण ते वाफेवर तयार केले गेले आहे आणि तेलात नाही, म्हणून त्यात कमी कॅलरी आहेत. ढोकलाच्या 100 ग्रॅममध्ये केवळ 160 कॅलरी असतात.

कडधान्ये

कडधान्य आपल्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात. न्याहारीसाठी किंवा जेवणासाठी याचा समावेश करता येऊ शकतो. अंकुरलेले धान्य ऊर्जा देणारे अन्न असते, जे वजन देखील नियंत्रित करते. अधिक आरोग्यपूर्ण आणि चवदार होण्यासाठी आपण बर्‍याच भाज्या आणि मसाल्यांचा यात वापर करू शकता. कित्येक अभ्यासातून असे दिसून येते की मोड आलेले कडधान्य प्रथिनेंचे प्रमाण वाढविण्यात मदत करतात. कडधान्यांमध्ये आवश्यक प्रमाणात अमीनो एसिड देखील असतात.

पोहे

सकाळी नाष्ता करून झाल्यानंतर आपल्या दिवसभरात खूप काम करावी लागतात. जर आपण सकाळीच पोटभर खाल्लं असेल तर  काळजी नसते. नाष्त्याला पोहे खाल्याने दुसरं काही खाण्याची गरज भासत नाही. पोहे खाल्यानं पोट भरतं. पोह्यात कार्बोहायड्रेट्स असतात. दिवसाची चांगली सुरूवात होण्यासाठी तसंच उर्जा मिळण्यासाठी पोहे हा अतिशय उत्तम पर्याय आहे.  पोह्यांच्या सेवनानं शरीराला पोषण मिळतं.  तसंच खाताना वेगवेगळ्या चवींचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. चवीनं खाण्याबरोबरच पोषणही मिळत असल्यामुळे पोह्याचा समावेश नाष्त्यासाठी करायला हवा. पोह्यात खूप कमी कॅलरिज असतात. 

पालकची इडली

व्हिटॅमिन आणि कॅल्शियम समृद्ध, इडली आंबलेल्या तांदळापासून बनविली जाते. त्यात पालक जोडून आपल्या नेहमीच्या इडलीच्या पिठात एकत्र करा. सांभार किंवा नारळाच्या चटणीसह या पालकाच्या इडलीचा आनंद घ्या. अशी न्याहारी घेतल्यास तुम्हाला जंक फूड खावसं वाटणार नाही. कारण या पदार्थानं पोट बराचवेळ भरलेलं वाटेल. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्यकोरोना वायरस बातम्या