Join us

तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर नाश्यात ट्राय करा 'ही' टेस्टी डिश, दिवसभर मिळेल भरपूर एनर्जी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:09 IST

Makhana-Curd Healthy Recipe: तुम्हाला जर दिवसभर एनर्जी मिळवायची असेल आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत.

Makhana-Curd Healthy Recipe: सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील आहारापैकी सगळ्यात महत्वाचा असतो. कारण सकाळच्या नाश्त्यानंच तुम्ही दिवसभर एनर्जेटिक आणि फ्रेश राहू शकता. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही काय खाता हेही तेवढंच महत्वाचं ठरतं. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक सकाळी नाश्त्यात पोहे, इडली, वडा सांभार, उपमा, वडापाव या गोष्टी खातात. पण तुम्हाला जर दिवसभर एनर्जी मिळवायची असेल आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. जी तुम्हाला एनर्जी तर देईलच सोबतच टेस्टीही लागेल. 

मखाने आणि दही

मखाने ड्राय फ्रूट्समध्ये वजनानं सगळ्यात हलके असतात. याचे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. यात कॅल्शिअमसोबतच, प्रोटीन, आयर्न, कार्बोहायड्रेट, मिनरल्स आणि मॅग्नेशिअम यांसारखे पोषक तत्व भरपूर असतात. मखाने आणि दही जर एकत्र करून खाल्ले तर तुम्हाला ही डिश पुन्हा पुन्हा खावी वाटेल. चला जाणून घेऊ याची रेसिपी.

साहित्य

१  कप रोस्टेड मखाने

अर्धा कप दही

अर्धा कप डाळिंबाचे दाणे

कापलेली कोथिंबीर

चिमुटभर जिरे पावडर

चिमुटभर काळी मिरे

चिमुटभर लाल मिरची पावडर

टेस्टनुसार काळं मीठ

कशी तयार कराल ही डिश?

मखाना आणि दह्याची हेल्दी डिश तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून त्यात मखाने चांगले भाजून घ्या. मखाने जळणार नाही याची काळजी घ्या. तूप टाकाल तर मखाने जास्त हेल्दी आणि टेस्टी होतील.

त्यानंतर एका वाटीमध्ये अर्धा कप दही घ्या आणि ते चांगलं फेटा. यात अर्धा कप डाळिंबाचे दाणे टाका. नंतर चिमुटभर जिरे पावडर, काळी मिरे, लाल मिरची पावडर आणि मीठ टाका. या गोष्टी चांगल्याप्रकारे मिक्स करा. मीठ जरा उशीरा टाकाल तर टेस्ट अधिक चांगली होईल. 

जेव्हा दह्याचं बेटर चांगल्या पद्धतीने तयार होईल, तेव्हा यात रोस्टेड मखाने टाकून मिक्स करा. नाश्त्यासाठी हेल्दी मखाना-दही सलाद तयार आहे.

मखाने आणि दही खाण्याचे फायदे

- मखाने आणि दही एकत्र खाल्ल्याने पचन तंत्र चांगलं राहतं. अपचन, गॅस, बद्धकोष्ठता अशा पोटासंबंधी समस्याही दूर होतात.

- या टेस्टी आणि हेल्दी डिशमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे हृदयासाठी चांगले असतात. तसेच नियमितपणे हे खाल तर कोलेस्टेरॉलची वाढलेली लेव्हलही कमी होते. 

- मखाने आणि दह्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो.

टॅग्स :अन्नआरोग्य