Join us

खिचू खाऊन पाहिला की नाही? पौष्टिक आणि पचायला हलका मस्त गुजराथी पदार्थ - पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 19:44 IST

Have you tried Khichu? A nutritious and easy to digest Gujarati dish - see the recipe : सोपी आणि झटपट नाश्त्याची रेसिपी नक्की तयार करा.

कधी खिचू हे नाव ऐकले आहे का? हा एक गुजराथी नाश्त्याचा प्रकार आहे. काही हलकं खायची इच्छा असेल तर हा पदार्थ तयार करा. (Have you tried Khichu? A nutritious and easy to digest Gujarati dish - see the recipe)चवीला तर छान आहेच, पण पौष्टिकही आहे. कांदा लसूण विरहित पदार्थ खायचे असतील तर हा पदार्थ खा. नाश्त्यामध्ये हलकं आणि पोटभरीच खायला मिळालं तर पुढचा दिवस मस्त जातो. वजनाची चिंता न करता चविष्ट पदार्थ खायला मिळाले, की एकदम भारीच. तयार करायला फारच सोपा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.(Have you tried Khichu? A nutritious and easy to digest Gujarati dish - see the recipe)

साहित्य;  पाणी, ओवा, जीरं, मिरची, मीठ, तेल, बेकिंग सोडा, तांदळाचं पीठ, कोथिंबीर  

प्रमाण :(Have you tried Khichu? A nutritious and easy to digest Gujarati dish - see the recipe) अडीच कप पाणी  एक चमचा ओवा  एक चमचा जीरं  एक चमचा मिरची पेस्ट  चवीनुसार मीठ  दोन चमचे तेल  एक चमचा बेकिंग सोडा  अर्धी वाटी तांदळाचं पीठ  

कृती : १. एका पातेल्यात अडीच कप पाणी घ्या. या प्रमाणानुसार तीन जणांपुरता नाश्ता तयार करता येतो. त्या पाण्याला थोडं गरम होऊ द्या.  

२. त्यात एक चमचा भरून ओवा घाला. एक मोठा चमचा जीरं घाला. त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. त्यात चवीपुरतं मीठ घाला. दोन चमचे तेल घाला. सगळं व्यवस्थित उकळून घ्या.  

३. नंतर चमचाभर बेकिंग सोडा घाला. त्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ घाला. मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. गुजराथी घरांमध्ये हा पदार्थ तयार करताना लाटण्याने ढवळला जातो. किंवा रवी घुसळणीची मागची बाजू वापरतात.  

४. पाणी आटल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. आणि वाफवून घ्या. पाच मिनिटे तरी वाफवा.  

५. खाताना त्यावर कच्चं तेल घाला. कोथिंबीर चिरून वरतून घाला.  

अति चिकट होणार नाही याची काळजी घ्या. कधी नाश्ता तयार करायची घाई असेल, तर अशावेळी हा पदार्थ तयार करा. पटकन तयार होतो आणि चवीला ही चांगला लागतो.

टॅग्स :अन्नगुजरातपाककृतीआहार योजना