Lokmat Sakhi >Food > कधी घरी केला का फराळी बटाटा चिवडा ? विकतपेक्षा मस्त होतो.. फक्त एक टिप लक्षात ठेवा

कधी घरी केला का फराळी बटाटा चिवडा ? विकतपेक्षा मस्त होतो.. फक्त एक टिप लक्षात ठेवा

Have you ever made Farali Potato Chivda at home? : विकतचा बटाटा चिवडा राहू द्या. घरीच करा मस्त चविष्ट चिवडा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2025 12:10 IST2025-05-04T12:06:35+5:302025-05-04T12:10:01+5:30

Have you ever made Farali Potato Chivda at home? : विकतचा बटाटा चिवडा राहू द्या. घरीच करा मस्त चविष्ट चिवडा.

Have you ever made Farali Potato Chivda at home? | कधी घरी केला का फराळी बटाटा चिवडा ? विकतपेक्षा मस्त होतो.. फक्त एक टिप लक्षात ठेवा

कधी घरी केला का फराळी बटाटा चिवडा ? विकतपेक्षा मस्त होतो.. फक्त एक टिप लक्षात ठेवा

बटाट्याचा छान कुरकुरीत चिवडा एकदा खायला सुरवात केली की कितीही खाल्ला जातो. हा चिवडा फार लोकप्रिय आहे. (Have you ever made Farali Potato Chivda at home? )बटाटा चिवडा घरी करणे तसे अगदीच सोपे आहे. पण घरी केलेला अनेकदा चामट होतो किंवा त्याचा भुगा होतो अशी तक्रार असते. म्हणून विकतचा आणणे लोकांना सोयीस्कर वाटते. या पद्धतीने बटाटा चिवडा केला तर नक्कीच भुगा होणार नाही. (Have you ever made Farali Potato Chivda at home? )एक स्टेप लक्षात ठेवा आणि विकतपेक्षा मस्त चिवडा करा.

साहित्य
बटाटा, कडीपत्ता, शेंगदाणे, तेल, मीठ, पिठीसाखर, काजू, मनुका, बदाम    

कृती
१. बटाट्याचा चिवडा करताना बरेच जण बटाटा किसून घेतात. त्यामुळे मग चिवड्याचा लगदा होतो. तळताना किस करपतो आणि चवही फार छान लागत नाही. मस्त कुरकुरीत जाड काप जसे विकतच्या चिवड्यामध्ये असतात तसे घरी होत नाहीत. म्हणून बटाटा कधीही किसून घ्यायचा नाही. त्याऐवजी वेगळी पद्धत वापरायची.

२. बटाटे व्यवस्थित धुऊन घ्या. बटाट्याची सालं सोलून घ्या.  किसणीला गोल पाडण्यासाठी चकती असते. त्याचा वापर करा आणि बटाट्याचे गोल पाडून घ्या. सुरीपेक्षा छान पातळ असे गोल होतात. गोल पाडून झाल्यावर एकावर एक गोल ठेवा आणि सुरीने लांब लांब काप करुन घ्या. अगदी विकतचे असतात तसेच होतील. 

३. एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये बटाट्याचे काप टाका. व्यवस्थित धुवा. दोनदा तरी पाणी बदला आणि बटाटा साफ रा त्यातील स्टार्च कमी होईल. नंतर एका कॉटनच्या कापडावर बटाटा पसरवून ठेवा. वरतून वेगळ्या फडक्याने पुसा म्हणजे बटाटा सुका होईल. थोडावेळ वाळू द्या. 

४. नंतर एका कढईमध्ये तेल घ्या. जरा तापवा. मग त्यामध्ये थोडा-थोडा बटाटा घाला आणि तळून घ्या. तळून झाल्यावर एका परातीमध्ये काढून घ्या. कढईमध्ये कडीपत्त्या घ्या तो ही छान परता मग परातीमध्ये काढून घ्या. तळणीसाठी चांगला जाळीचा खोलगट झारा घ्या. तेल नीट निथळवून मगच पदार्थ परातीत घ्या. कडीपत्यानंतर शेंगदाणे मस्त कुरकुरीत तळून घ्या. काजूचे तुकडे करा ते ही तळा. बदामाचे तुकडेही तळून घ्या. मनुका परतून घ्या. तळू नका. सगळे पदार्थ एकत्र करा.

५. त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. थोडी पिठीसाखर घाला. तुमच्या आवडीचा इतरही सुकामेवा घालू शकता. हवाबंद डब्यामध्ये चिवडा साठवून ठेवा.         

Web Title: Have you ever made Farali Potato Chivda at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.