Join us

कांद्याची कचोरी कधी खाल्ली का? बाहेरुन कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत कचोरी पावसाळ्यात खायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 19:39 IST

Have you ever eaten onion kachori? Crispy on the outside and soft on the inside : पावसाळ्यात घरी करा खास कांद्याची कचोरी. करायला सोपी आणि लहान मुलांना तर नक्कीच आवडेल.

पावसाळ्यात नाश्त्यासाठी ही कांद्याची कचोरी नक्की करा. (Have you ever eaten onion kachori? Crispy on the outside and soft on the inside)करायला अगदी सोपी आहे. तसेच चवीलाही मस्त लागते. चहासोबत अशी कचोरी मिळाली तर मज्जाच येईल. 

साहित्य जिरे, धणे, कसुरी मेथी, मैदा, मीठ, लाल मिरची, लसूण, तेल, काळी मिरी, बटाटा, हिंग, ओवा, कोथिंबीर, तूप, पाणी, हळद, आलं 

कृती१. सगळ्यात आधी परातीत मैदा घ्यायचा. त्यात चमचाभर पातळ केलेले तूप घालायचे. चमचाभर मीठ घालायचे आणि मग हातावर ओवा घ्यायचा जरा मळायचा आणि मैद्यात घालायचा. (Have you ever eaten onion kachori? Crispy on the outside and soft on the inside)सगळं छान मिक्स करायचं मग त्यात पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. पोळीसाठी जसे पीठ मळता तसेच पीठ मळा जरा सैलसर ठेवायचे. मळून झाल्यावर पीठ झाकून ठेवायचे. 

२. बटाटा उकडून घ्यायचा. बटाटा जास्त घ्यावा लागतो. कचोरी जरी कांद्याची असली तरी त्यात बटाटा महत्त्वाचा असतो. बटाटा उकडून झाल्यावर मस्त मऊ कुसकरून घ्यायचा. त्यात अजिबात तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. व्यवस्थित कुसकरला जाईल एवढा स्मॅश करायचा. 

३. एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली लाल मिरची घ्यायची. पाणी काढून टाकायचे पाणी फारच तिखट असते. मिरचीसोबत लसूण घालायची. थोडं आलं घालायचं आणि सगळं मस्त वाटून घ्यायचं. त्याची पेस्ट तयार होईल. गरज असेल तर पाणी घालायचे. 

४. एका पॅनमध्ये काळी मिरी घ्या. जिरे घ्या तसेच धणे घ्या आणि छान खमंग परतायचे. तेल तूप काही घालू नका. सुका मसाला परतायचा. परतून झाल्यावर कुटून घ्या. किंवा मिक्सरमधून फिरवा.  

५. एका कढईच चमचाभर तेल घ्यायचे. तेलावर जिरे घाला आणि मग सुका मसाला परतायचा. मसाला जरा परतला की त्यात लाल मिरचीची पेस्ट घालायची. छान परतायची मग बटाटा घालायचा. कोथिंबीर घालायची. सगळं छान परतायचे. गॅस बंद करायचा आणि भरपूरसा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा घालून झाल्यावर सगळं छान मिक्स करायचे आणि मग जरा गार होऊ द्यायचे.

६. पीठाच्या पुऱ्या लाटा त्यात मसाला भरा आणि व्यवस्थित पीठाने पुरीचे तोंड बंद करा. छान लाटा. मग कडक तापलेल्या तेल्यात तळून घ्या. मस्त कुरकुरीत कचोरी तयार होईल.     

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.