कोकणात फळांचे अनेक पदार्थ केले जातात. आंब्याचे पदार्थ सर्वांच्या माहितीचे असतात मात्र इतर फळे जरा दुर्लक्षितच राहतात. करवंद, काजू इतरही फळे खाल्ली जातात. त्यांचे विविध पदार्थ केले जातात. (Have you ever eaten jackfruit puree? try this sweet dish )तसेच फणस भरपूर आवडीने खाल्ला जातो. फणसाचे गरे केले जातात फणसाची भाजी केली जाते. फणासाच्या पुऱ्या केल्या जातात आणि इतरही अनेक पदार्थ केले जातात. त्यातीलच एक मस्त खमंग पदार्थ म्हणजे फणसाची पापडी किंवा फणसाची पुरी. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा पदार्थ ओळखला जातो. करायला फार काही कष्ट लागत नाहीत मात्र खाताना अगदी मज्जा येते.
साहित्य
बरका फणस, गूळ, कणिक, रवा, तूप, तेल
कृती
१. कापा फणस वापरू नका. बरका फणसचं घ्यायचा. (Have you ever eaten jackfruit puree? try this sweet dish )कापा फणस घेतला तर त्याच्या पुऱ्या चांगल्या होत नाहीत. फुगत नाहीत आणि चामट होतात. फणसाचे गरे काढून घ्यायचे. फणसाच्या बिया काढून घ्यायच्या. फणसाचे गरे पातळ करुन घ्यायचे. त्याचा रस करायचा. मिक्सरचा वापर करायचा. रस छान पातळ करायचा. पाणी अजिबात घ्यायचे नाही गरा चिकट असतो त्यामुळे रसही चिकट होतो.
२. फणसाचा रस जेवढा घ्याल तेवढाच गूळ घ्यायचा. गूळ छान किसून घ्यायचा. खोलगट पातेल्यात थोडं तूप घ्यायचं. त्यावर फणसाचा रस ओतायचा. त्याला एक उकळी आली मग त्यात किसलेला गूळ घालायचा. मिश्रण सतत ढवळत राहायचे. ढवळले नाही तर करपेल आणि पुऱ्या करता येणार नाहीत. गॅस मंदच ठेवायचा. एक दहा मिनिटांनी मिश्रण जरा घट्ट होईल. मग गॅस बंद करायचा आणि त्यात कणिक घालायची. कणिक जास्त घालू नका. त्याचे पीठ मळता येईल एवढीच कणिक घालायची. मिश्रण गार झाले की हाताला तूप लावायचे आणि मस्त मऊ कणिक मळून घ्यायची. पोळीसाठी जशी मळता अगदी तशीच.
३. प्लास्टिकचा पेपर पोलपाटावर ठेवायचा. त्याला तेल लावायचे आणि हाताने पुऱ्या थापायच्या. छान गोल आणि जाडसर पुऱ्या करा. तेल मस्त गरम तापवायचे. तेलात एकएक करुन पुऱ्या सोडायच्या छान फुलतात आणि खमंग होतात.